पुणे : पुण्यासाठी मोठा दिलासा मिळाला असून गेल्या दोन महिन्यात पहिल्यांदाच नवीन कोरोना रूग्णांचा चोवीस तासातील आकडा पाचशेपेक्षा खाली आला आहे. पुण्यात रविवारी (ता.२३) रोजी नवीन रूग्णांची संख्या अतिशय कमी आढळल्याने प्रशासनासह सर्वांना दिलासा मिळाला आहे.(The number of new patients in Pune is below five hundred)
रविवारी तपासणी करणाऱ्या काही केंद्रांना सुटी असते. त्यामुळे टेस्ट कमी होतात. परिणामी सोमवारी येणारा रूग्णांचा आकडा कमी असतो. आजदेखील तीच शक्यता आहे. तरीपण ही संख्या अपेक्षेपेक्षाही कमी आहे. पुण्यात गेल्या रविवारी ६८४ रूग्ण आढलेले होते. आज त्यापेक्षाही कमी रूग्ण आढलले आहेत. पुण्यातील एकुण उपचार घेत असलेल्या (ॲक्टिव्ह) रूग्णांची संख्याही १० हजारांच्या खाली गेली आहे. त्यामुळे प्रशासनासह साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
एप्रिल महिना हा पुणेकरांसाठी कसोटीचा काळ होता. संपूर्ण एक्रिल महिन्यात आणि या महिन्याच्या सुरवातीला कोणत्याही रूग्णालयात बेड मिळण्याची शक्यता नव्हती. व्हेटिलेटर, ऑक्सिजन तसेच रेमेडेसिव्हीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे अनेकांचे प्राण या काळात गेले आहेत. गेल्या चार दिवसात नवीन रूग्णांची संख्या झापट्याने घडत असल्याने प्रशासनावरचा ताण बराचसा कमी झाला आहे. आता जवळनास सर्वच रूग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. उपचार घेत असलेल्या रूग्णांचा आकडादेखील १० हजाराच्याखाली आला आहे.
एप्रिल महिन्यात अडचणी आल्याने गेल्या महिनाभरात पुण्यात विविध भागात विशेषत: उपनगरात अनेक ठिकाणी कोवीड केअर सेंटर तसेच कोवीड हॉस्पिटल मोठ्याप्रमाणात सुरू झाली आहेत. ऑक्सिजनच्या पुरवठ्याचे मोठे संकट मधल्या काळात उभे राहिले होते. त्यावर मात करण्यात यश मिळाले आहे. मात्र, आता रूग्णांची संख्या रोजच झपाट्याने कमी होत असल्याने रूग्णालये व प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत झाली आहे. पुण्यातील स्थिती सुधारण्याच्या वाटेवर असली तरी पुढचा बराचसा काळ कोणत्याही संकटाशिवाय काढायचा असेल तर पुणेकरांनी स्वत:ला शिस्त लावण्याची नितांत गरज आहे.
Edited By : Umesh Ghongade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.