आता चंद्रकांतदादा शिक्षण संचालकांचं काय करणार?

Chandrakant Patil : अनफिट असल्याबाबतचा अहवाल जे जे रुग्णालयाकडून प्राप्त झाला आहे.
Chandrakant Patil Latest News
Chandrakant Patil Latest NewsSarkarnama

पुणे : राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॅा. धनराज माने यांचा वैद्यकीय अहवाल आज राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार डॅा. माने हे उजव्या डोळ्याने अंध आहेत तर डाव्या डोळ्याने त्यांना केवळ 10 टक्के दिसत असल्यामुळे ते उच्च व शिक्षण विभागाचा संचालक पदाचा पदभार स्विकारण्यास अनफिट असल्याबाबतचा अहवाल जे जे रुग्णालयाकडून देण्यात आला आहे. (Chandrakant Patil Latest News)

Chandrakant Patil Latest News
राज्याबाहेर उद्योग जाताहेत या टीकेला अर्थ नाही..अनेक उद्योग वेटिंगवर आहेत...

काही दिवसांपूर्वी कॅाप्स विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचा प्रमुख असणाऱ्या अमर एकाड या तरुणाने डॅा. धनराज माने यांच्याविरोधात मुंबईतील आझाद मैदानात जवळपास 20 दिवस आंदोलन केलं होतं. त्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिलं होतं की, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॅा. धनराज माने यांची मुंबईतील जे जे रुग्णालयात तपासणी करण्यात येईल आणि यासाठी आपण एक समिती देखील स्थापन करत आहोत. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे अश्वासन दिले होते.

Chandrakant Patil Latest News
चंद्रकांतदादांचा 'हा' सल्ला नेते ऐकणार का?

दरम्यान, याच समितीने आता आपला अहवाल उच्च शिक्षण विभागाला सूपूर्द केला असून ज्यामध्ये त्यांनी डॅा. माने हे आपला पदभार स्विकारण्यास असमर्थ असल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे माने यांच्याबाबत राज्य सरकार आणि चंद्रकांतदादा (Chandrakant Patil) काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in