...आता रेल्वेप्रमाणे ट्रक आणि बस इलेक्ट्रिक केबलवर चालणार !

राज्यात रस्त्यांची सर्वाधिक कामे आणि सर्वाधिक निधी सोलापूर जिल्ह्यात.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

पुणे : लवकरच इलेक्ट्रिक हायवे बांधण्याचे काम सुरू करणार असून या माध्यमातून रेल्वेप्रमाणे इलेक्ट्रिक बस आणि मालट्रक लवकरच डांबरी रस्त्यावरून धावताना दिसतील, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

Nitin Gadkari
...तर ऊस उत्पादक शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येईल !

सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांचे भूमीपूजन व लोकार्पण कार्यक्रमात गडकरी यांनी भविष्यातील वाहतुकीची साधणे आणि इंधनाच्या क्षेत्रात होणाऱ्या क्रांतीकारी बदलाची माहिती दिली. अशा प्रकारचा पहिला प्रकल्प कुठे आणि कधीपर्यंत होणार या बद्दल अधिक तपशील त्यांनी दिला नाही. ते म्हणाले, ‘‘ लवकरच इलेक्ट्रिक हायवेच्या बांधणीचे काम हाती घेणार आहे. ज्याप्रमाणे रेल्वे इलेक्ट्रिक केबलवर चालते त्याप्रमाणे केबल बांधणीचे रस्ते तयार करून त्यावर बस तसेच मालवाहतूक करणारे ट्रक चालविता येतील. बस किंवा ट्रकसारख्या वाहनाला टायर कायम असतील. रस्त्यावरूनच ही वाहने चालतील. मात्र, त्यासाठी सध्याच्या वाहनांना असलेले इंजिन वा इतर कोणत्याही इंधनाची गरज भासणार नाही. इलेक्ट्रिक केबलवर ही वाहने चालतील. मुख्यत: शहरामध्ये याचा उपयोग होईल.’’

Nitin Gadkari
गडकरीसाहेब ! मी तुमच्या घरचा कढी भात खाल्लाय !

गडकरी म्हणाले, ‘‘ गेल्या सात वर्षात सोलापूर जिल्ह्यात ३७ हजार कोटी रूपयांची रस्त्याची कामे झाली आहेत. आणखी वीस हजार कोटी रूपयांच्या खर्चाचे प्रकल्प सुरू आहेत. एकुण विचार केला तर जवळपास ६० हजार कोटी रूपयांची रस्त्यांची कामे एकट्या सोलापूर जिल्ह्यात होत आहेत. राज्यात रस्त्यांच्या कामाला सर्वाधिक निधी सोलापूर जिल्ह्यात गुंतविण्यात आला आहे. आजच्या कार्यक्रमात सर्व आमदार व खासदारांनी सुचविलेली नव्या रस्त्यांची कामे करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे ६० हजार कोटींचा हा आकडा एक लाख कोटी रूपयांपर्यंत जाईल. एकदा शब्द दिला तर तो पाळण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील कामाच्या भूसंपादनासाठी लागणारा निधी उपलब्ध होण्यासाठी खासदार-आमदारांनी प्रयत्न करावा. भूसंपादनासाठी तातडीने लागणारा शंभर कोटी रूपयांचा निधी माझ्या विभागाकडून देण्याची माझी तयारी आहे. मात्र, ते पैसे कृपा करून मला परत मिळावेत.’’

दरम्यान, गडकरी यांच्या आजच्या दौऱ्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण भाजपामय झाले होते. जिल्ह्यातील जवळपास सर्व आमदार-खासदार तर होतेच शिवाय भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील जवळपास डझनभर रस्त्यांच्या कामाचे प्रस्ताव गडकरी यांच्याकडे दिले. या सर्वच प्रकल्पांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्‍वासन गडकरी यांनी दिल्याचे आमदार रणजीतसिंह माहिते-पाटील यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com