Nurseries education : शिक्षणमंत्री केसरकरांचा मोठा निर्णय ; आता गल्ली-बोळांतील बेकायदा नर्सरी..

Permission for nurseries : बालवाडी, नर्सरी सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागणार
Dipak Kesarkar
Dipak KesarkarSarkarnama

Permission will also be required for nurseries : राज्यात अनेक ठिकाणच्या नर्सरी या अनाधिकृत असल्याचा तक्रारी सामाजिक संघटनांनी शिक्षण विभागाकडे केल्या आहेत. याबाबत शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. (now permission will also be required for nurseries education minister deepak kesarkars announcement)

पूर्वप्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळा,संस्था गल्लोगल्ली उघडण्यात आल्या असून नर्सरी- केजीच्या नावाखाली पालकांकडून मोठ्या प्रमाणात पैसा उकळला जात आहे. पालकांकडून पैसा घेतल्यानंतरदेखील गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याची कोणतीही शाश्वती या नर्सरीमध्ये नसल्याचेही समोर आले आहे.

Dipak Kesarkar
Pune Lok Sabha constituency : पुणे लोकसभा पोटनिवडणूक ; पक्षाने संधी दिली तर त्याचं सोनं करण्याची मुळीकांची तयारी !

या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी शालेय शिक्षणमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बालवाडी, नर्सरी सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

नर्सरी-बालवाडी सुरु करताना कुणीही नियम पाळत नाहीत, कोणीही खोली भाड्याने घेऊन नर्सरी सुरु करतात, याला आळा बसण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे केसरकरांनी सांगितले. "प्राथमिक शिक्षणात मुलाचा पाया घडतो, त्यामुळे प्राथमिक शिक्षण दर्जदार, आणि सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचे केसरकर म्हणाले.

Dipak Kesarkar
Central vista project :'सेंट्रल व्हिस्टा' तून दरवर्षी एक हजार कोटी वाचणार ; मोदी सरकारचा दावा, सविस्तर वाचा..

नर्सरी आणि केजीमध्ये प्रवेश देण्यासाठी विविध शाळा, संस्था पालकांकडून २० हजारांपासून एक लाखांपर्यंत शुल्काची आकारणी करत असताना प्रत्यक्षात या वर्गांना महापालिका शिक्षण मंडळाची किंवा जिल्हा परिषदेची परवानगीच नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

शहरात किती नर्सरी, बालवाड्या आहेत,याची आकडेवाडी शिक्षण मंडळाकडे नसल्याचे आढळले आहे. शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे गल्ली-बोळांत कुणालाही आता परवानगी न घेता नर्सरी-बालवाडी सुरु करता येणार नाही. या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com