आता सुरत पॅटर्न पिंपरीत; असा निर्णय घेणारी राज्यातील पहिलीच पालिका

PCMC|Pimpri-Chinchwad|Rajesh Patil : पिंपरी पालिकेच्या शिष्टमंडळाने नुकताच गुजरात राज्यातील सुरत महापालिकेचा अभ्यास दौरा केला होता.
PCMC Commissioner Rajesh Patil Latest News
PCMC Commissioner Rajesh Patil Latest News Sarkarnama

पिंपरी : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून यावर्षीच्या १५ ऑगस्टपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) सर्व कार्यालयांत दररोज सकाळी दहा वाजता राष्ट्रगीत वाजवण्याचा निर्णय पालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी काल (ता.२१जुलै) घेतला.

त्यानंतर त्यांनी आज (ता.22 जुलै) दुसरा निर्णय घेत येत्या स्वातंत्र्यदिनापासूनच पालिका अधिकाऱ्यांना ड्रेसकोड तथा गणेवश लागू केला आहे. हे दोन्ही निर्णय घेणारी पिंपरी पालिका ही राज्यातील पहिली पालिका आहे. (PCMC Commissioner Rajesh Patil Latest News)

PCMC Commissioner Rajesh Patil Latest News
बारणेंच्या स्वागताची तयारी मात्र शिवसैनिकांना रोखण्यासाठी घर,कार्यालयाला पोलिसांचा बंदोबस्त

तृतीयपंथीयांना पेन्शन योजना, त्यांना पालिका सेवेत नोकरी असे क्रांतीकारी निर्णय नुकतेच पिंपरी पालिकेने घेतलेले आहेत. त्यानंतर आता प्रशासनाने स्वताकडे लक्ष देण्याचे ठरवले. त्यानुसार कार्यालयात काम सुरु करण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवण्याचा निर्णय प्रथम घेतला. त्यानंतर क्लास वन आणि क्लास टू अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू केला आहे. पालिकेत येणाऱ्या नागरिकांना अधिकारी कोण हे ओळखता यावेत, यासाठी हा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.

PCMC Commissioner Rajesh Patil Latest News
आढळराव पाटील कोठूनही निवडणूक लढवा निष्ठावंत शिवसैनिक तुमचा पराभवच करेल...

त्यानुसार क्लास वन अधिकाऱ्यांसाठी नेव्ही ब्लू रंगाची पॅन्ट व निळ्या रंगाचा शर्ट, तर क्लास टू साठी फेंट ब्लू रंगाचे पॅन्ट, शर्ट असणार आहेत. यामुळे अधिकारी कोण हे, तर ओळखले जाईलच, शिवाय त्यातील प्रथमश्रेणीतील कुठले व व्दितीय श्रेणीचे कोण हे सुद्धा कळणार आहे. महिला अधिकाऱ्यांना, मात्र रंगात काहीसा चॉईस देण्यात आला आहे. क्लासवन अधिकारी महिलेला ब्लू अॅन्ड यलो रंगाची साडी, तर क्लास टू करिता ब्लू रंगातील साडी असणार आहे, अशी माहिती या योजनेचे समन्वयक आणि पालिका उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. पालिका अधिकाऱ्यांना या ड्रेसवर भविष्यात समारंभासाठी टाय व जाकीट देण्याचा विचार आहे, असे ते म्हणाले.

PCMC Commissioner Rajesh Patil Latest News
बारणे ज्या पक्षात जातात तो पक्ष संपतो, आता शिंदे गटही संपवून टाकतील

या गणवेषाची संकल्पना राबविण्यापूर्वी पिंपरी पालिकेच्या शिष्टमंडळाने नुकताच गुजरात राज्यातील सुरत महापालिकेचा अभ्यास दौरा केला. तेथील अधिकारीच नाही, तर कर्मचारीही गणवेषात असतात. गणवेषामुळे पालिका अधिकारी आणि कर्मचारी असल्याची जनमानसांत वेगळी ओळख निर्माण झाली असल्याचे तेथील अधिकारी, कर्मचा-यांनी सांगितले. या शिष्टमंडळात उपायुक्त इंदलकर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, पिंपरी पालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com