'आव्हाड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनीच वस्तुस्थिती स्पष्ट करावी'

Ajit Pawar | जितेंद्र आव्हाड एका महिलेला बाजूला करुन निघून गेले. मुख्यमंत्र्यांपासून पाच-दहा फुटांचचं अंतर असेल.
'आव्हाड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनीच वस्तुस्थिती स्पष्ट करावी'

Ajit Pawar पुणे : आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर ज्या प्रकारामुळे विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे तो व्हिडिओ मी पाहिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच घडली ही घटना घडल्याने त्यांनी स्वतः पुढे येऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या गाडीत बसले होते, तिथला जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्या गाडीच्या डाव्या बाजुला तिथे एक पोलिस आफिसरही दिसतात. जितेंद्र आव्हाड एका महिलेला बाजूला करुन निघून गेले. मुख्यमंत्र्यांपासून पाच-दहा फुटांचचं अंतर असेल. तिथे विनयभंगाचा असा कोणताही प्रकार घडला नाही. हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं पाहिजे

'आव्हाड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनीच वस्तुस्थिती स्पष्ट करावी'
Khatav : मांजरेकरांच्या निषेधार्थ भोसरेत मोर्चा; इतिहासाच्या मोडतोडीवर ग्रामस्थ संतप्त

आम्हीही प्रतिनिधी होतो, महाराष्ट्राची निर्मीत झाल्यापासून राजकारण पाहत आलोय पण अलीकडे राज्याच्या राजकारणात गलिच्छ प्रकार घडत आहेत. राजकीय वैचारिक मतभेद, मतमतांतरे असू शकतात. पण असे प्रकार घडत असतील तर महाराष्ट्रासाठी परवडणाऱ्या नाहीत. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. असंही त्यांनी म्हटलं आहे.

आज राज्यात महागाई, बेरोजगारी प्रमुख प्रश्न आहेत. राज्यातून प्रकल्प बाहेर जाण्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहे. हे आताच्या राज्य कर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे सुरु आहे. ते सांगतात पुर्वीच्या सरकारने योग्य निर्णय घेतले नाहीत. पण आता किती दिवस खडे फोडणार आहात. असा सवालही अजित पवार यांनी केला आहे. जुलैपासून आज नोव्हेंबर आला पाच महिने झाले. नव्याचे नऊ दिवस असतात, चांगले काही झाले तर त्यांच्यामुळे चुकीच काही झालं तर मागच्या सरकारमुळे झालं अस राज्य सरकारचं सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in