Chandrakant Patil : शाईफेकीनंतर आता चंद्रकांत पाटलांची सोशल मीडियावर बदनामी; पोलिसांची मोठी कारवाई

Chandrakant Patil : राजकीय वर्तुळात एकच खळबळ
Chandrakant Patil
Chandrakant Patil Sarkarnama

Chandrakant Patil : भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी शाईफेक करण्यात आली होती. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या धक्कादायक प्रकारानंतर आता पुन्हा एकदा एक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सोशल मीडियावर चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत ध्वनिचित्रफीत प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत ध्वनिचित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात फेसबुकवरील सचिन १४१४ नावाच्या खातेधारकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पाटील यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर तसेच शिवीगाळ करणारा मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी वारजे आणि कोथरूड पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याप्रकरणी सनी किरण लांडे (वय ३२, रा. जयभवानीनगर, पौड रस्ता) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chandrakant Patil
APMC News; ‘ईडी’ची धमकी देणाऱ्या भाजप नेत्यांवर खटला भरणार!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरून ध्वनिचित्रफीत तयार करून प्रसारित करण्यात आल्याचे लांडे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. ध्वनिचित्रफितीत दोघे जण आक्षेपार्ह भाषेत पाटील यांच्याविषयी वक्तव्य करत असल्याचे आढळून आले आहे. ज्या खात्यावरून ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्यात आली आहे. त्या खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब बढे तपास करत आहेत.

Chandrakant Patil
'आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती' कायद्याच्या कचाट्यात अडकणार, पुण्यातूनच दिलं जाणार आव्हान !

पोलिसांची सुरक्षा भेदून पाटील यांच्यावर शाईफेक ...

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या ते सरकारवर अवलंबून राहिले नाही असं वादग्रस्त विधान केलं होतं. याच विधानामुळे पिंपरी चिंचवडमध्ये समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्याने शाई फेकली होती.

पोलिसांची सुरक्षा भेदून समता दलाचे कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचले होते आणि त्यांनी थेट पाटील यांच्यावर शाई फेकली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी गृहमंत्रालयाकडून ११ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन देखील करण्यात आले होते. यामध्ये ८ पोलीस कर्मचारी आणि तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com