आता बोगस सोमय्यांचाही राष्ट्रवादीला त्रास; मागवली आरटीआयखाली माहिती...

BJP|NCP|Ajit Gavhane : भाजपकडे भ्रष्टाचारावर उत्तर नसल्यानेच त्यांनी हा बनाव केला असल्याचा संशय पिंपरी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी व्यक्त केला आहे.
Kirit Somaiya & Ajit Gavhane
Kirit Somaiya & Ajit GavhaneSarkarnama

पिंपरी : भ्रष्टाचाराविरुद्ध व त्यातही महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) मंत्र्यांच्या गैरकाऱभाराविरोधात आवाज उठविल्याने भाजपचे (BJP) ईशान्य मुंबईचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सध्या मोठ्या प्रसिद्धीच्या झोतात तसेच चर्चेतही आहेत. त्यांच्यामुळे राज्य सरकारमधील काही मंत्री अडचणीत आले असून त्यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागलेला आहे. त्यातून सोमय्यांच्या नावाचा गैरवापर केल्याचे एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) सत्तेत असताना त्यांच्या दोन स्थायी समिती अध्यक्षांनी किती कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजूरी दिली, त्यांची शासकीय वाहने किती किलोमीटर फिरली आदींची विचारणा करणारी माहिती आरटीआय अॅक्टखाली सोमय्यांच्या नावे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे मागण्यात आली आहे.

Kirit Somaiya & Ajit Gavhane
२० लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षली जोडप्याची पोलिसांपुढे शरणागती...

पिंपरी महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सत्ताधारी भाजपला जेरीस आणलेले राष्ट्रवादीचे विद्यमान शहराध्यक्ष अजित गव्हाणे तसेच पक्षाचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळेंच्या (चिंचवड विधानसभा मतदारसंघ) स्थायी समिती अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतील माहिती किरीट सोमय्या असे नावच नाही, तर त्यांच्या नावाने सही करणाऱ्या व्यक्तीने आरटीआयखाली पिंपरी पालिकेकडून मागवली आहे. या मागणीचे अर्ज पालिकेला नुकतेच (ता.१० मार्च) पोस्टाने आले.

गव्हाणे हे २००७ ला, तर शितोळे हे २००९ ला स्थायीचे अध्यक्ष दोन वर्षासाठी होते. या दोघांनी स्थायी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कोणते निर्णय घेतले, त्यांच्या काळात कामे दिलेल्या कंत्राटदारांची केवायसी, निवडणुकीच्या वेळी या दोघांनी सादर केलेली शपथपत्रे आदींची माहिती `या` सोमय्यांनी पालिका आय़ुक्तांकडे मागितली आहे. मात्र, या अर्जावर तारीख नाही. मात्र, सोमय्यांची सही व त्यांच्या मुलुंड (पश्चिम), मुंबई येथील कार्यालयाचा पत्ता आहे. याबाबत समजताच गव्हाणे यांनी पालिका प्रशसनाकडे जाऊन सदर अर्ज तथा पत्र आल्याची खात्री केली. त्यानंतर त्यांनी यानिमित्ताने भाजपवर पुन्हा हल्लाबोल केला.

Kirit Somaiya & Ajit Gavhane
प्रवीण दरेकरांना सोमवारपर्यंत अटक करु नका!

दरम्यान, पालिकेच्या माहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागण्याऐवजी `या` सोमय्यांनी ती थेट अपिलीय अधिकारी आय़ुक्तांकडेच ती मागण्याच्या केलेल्या चुकीमुळे ही बोगसगिरी असल्याच्या संशयाची पाच चुकचुकली. यामुळे हे प्रकरण भाजपच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण त्यातून त्यांच्यावर आरोप करण्यासाठी आयते कोलीत राष्ट्रवादीच्या हाती आले आहे. दुसरीकडे हे आरटीआय अर्जच बनावट निघाल्याने पालिका प्रशासनाकडून त्यावर कार्यवाही होण्याचीही शक्यता नाही.

Kirit Somaiya & Ajit Gavhane
कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या गिरीश महाजनांच्या घरी लगीनघाई...

दरम्यान, ही माहिती सोमय्या यांनी मागवलीच नसल्याचे म्हणजे त्यासाठी त्यांनी आऱटीआयखाली हे अर्ज दिले नसल्याचे 'सरकारनामा'ने केलेल्या चौकशीत आढळून आले. कारण आपण हे अर्जच दिले नसल्याचे सरकारनामा प्रतिनिधीने संपर्क केला असता सोमय्यांनी गुरुवारी (ता.१७ मार्च) सांगितले. तसेच या अर्जांवरील सहीही आपली नसून ती बोगस असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचेच स्थायी समिती अध्यक्ष गेल्यावर्षी लाचखोरीत पकडले गेले, तर, दुसरे नगरसेवक खंडणीत आत गेले. त्यामुळे बॅकफूटवर गेलेल्या भाजपकडे भ्रष्टाचारावर उत्तर नसल्यानेच त्यांनी हा बनाव केला असल्याचा संशय गव्हाणेंनी व्यक्त केला आहे. तर, भ्रष्टाचारात पकडल्या गेलेल्या आपल्या स्थायी समिती अध्यक्ष तथा सभापतींची माहिती भाजपने मागवली असती, तर बरं झालं असतं, असा टोला शितोळे यांनी लगावला. सोमय्यांनी दखल घ्यावी एवढे आम्ही मोठे आहोत, हे प्रथमच समजले. त्यामुळे आनंद झाला, असा टोमणाही त्यांनी मारला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in