काम सोडून रंगली अधिकाऱ्यांची हुरडा पार्टी...वरिष्ठांनी पाठवली १९ जणांना नोटीस!

हुरडा पार्टीसाठी जाण्यापूर्वी नगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी प्रभारी मुख्याधिकाऱ्यांची परवानगी घेतली नव्हती.
Hurda Party
Hurda Partysarkarnama

दौंड (जि. पुणे) : कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत हुरडा पार्टी करणे दौंड (daund) नगरपालिकेतील एकूण १९ अधिकारी आणि कर्मचारी यांना चांगलेच अंगलट आले आहे. या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार संजय पाटील यांनी ही कारवाई केली आहे. (Notice to 19 officers & employees who used to party during office time)

दौंड नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी १३ जानेवारी रोजी पूर्व परवानगी न घेता वडगाव दरेकर (ता. दौंड) येथे हुरडा पार्टीसाठी गेले होते. नगरपालिकेचे दोन अधिकारी वगळता बहुतांश जण या हुरडा पार्टीत सहभागी झाले होते, त्यामुळे कार्यालयीन काम पूर्णपणे ठप्प झाले होते. त्या हुरडा पार्टीची चर्चा तालुक्यात रंगली होती. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांतून टीकास्त्र सोडण्यात येत होते. काम सोडून हुरडा पार्टी करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत होती.

Hurda Party
अजित पवारांनी बोट नाही ठेवले...पण दुर्गाडे थोरातांना जाऊन भेटले...!

दरम्यान, दौंड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर या मागील सहा महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार दौंड तालुक्याचे तहसीलदार संजय पाटील यांच्याकडे देण्यात आलेला आहे. पण, हुरडा पार्टीसाठी जाण्यापूर्वी नगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचीही परवानगी घेण्याची तसदी घेतली नव्हती. शिवाय त्यांना याबाबत कळविण्यात देखील आले नव्हते.

Hurda Party
निवडणुकीतील राडा अंगलट; राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्यावर १२ कलमे लावत गुन्हा दाखल

नागरिकांनी या प्रकरणी तक्रारी केल्यानंतर प्रभारी मुख्याधिकारी संजय पाटील यांच्या आदेशानुसार आज (ता. १७ जानेवारी) संबंधित १९ जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे तक्रार होईल; पण कारवाई होणार नाही, अशा भ्रमात असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com