मी पाटील; कुणाला घाबरणार नाही : चंद्रकांतदादा

दोन वर्षातील राज्य सरकारच्या कामाबाबत राज्यातील जनतेच्या मनात असंतोषाची भावना आहे.
चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील सरकारनामा

पुणे : दिल्ली दौऱ्याबाबत माहिती देऊन अपप्रचार करणारे सूत्र पक्षातील असो की बाहेरचे. पाटील काय चीज आहे त्यांना माहिती नाही. पाटील कुणाला घाबरणार नाही, या शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत अपप्रचार करणाऱ्यांना बजावले.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांच्याशी अमित शाह काय बोलले ?

पाटील यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या दोन वर्षाच्या कारभारावर टीका केली. यावेळी पाटील यांच्या वारंवार होणाऱ्या दिल्ली दौऱ्याबाबत प्रश्‍न विचारण्यात आला. दिल्ली दौऱ्यावर गेल्यानंतर आपल्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत अप्रचार केला जातो अशी सूत्रांची माहिती आहे. या प्रश्‍नावर पाटील आक्रमक झाले. ते म्हणाले, ‘‘ माध्यमांना काय वाटते त्यावर उत्तर द्यायला मी बांधील नाही. पक्षाच्या पातळीवर काम करायला मी समर्थ आहे. कुणी काहीही म्हटले तरी पाटील कुणाला घाबरणार नाही.’’

चंद्रकांत पाटील
ठाकरे सरकार घरात लपले; तेव्हा कोरोनाच्या कडेलोटातून केंद्राने सावरले

दोन वर्षातील राज्य सरकारच्या कामाबाबत राज्यातील जनतेच्या मनात असंतोषाची भावना आहे. या सरकारने शेतकरी, एसटी कामगार तसेच कोरोनाच्या संकट काळात सामान्य माणसाला मदत केलेली नाही. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात या सरकारबद्दल आस्थेची भावना नाही.कोरोनाच्या काळात राज्यातील जनतेची ससेहोलपट झाली आहे. मात्र, राज्य सरकारला जनतेच्या अडचणीशी काही देणेघेणे नाही,अशी टीका पाटील यांनी केली.

पाटील म्हणाले, ‘‘ मुख्यमंत्री आजारी आहेत.त्याच्या तब्बेतीत लवकर सुधारणा व्हावी ही आमची भावना आहे. मात्र, राज्य या प्रकारे चालत नाही.राज्याच्या विधानसभेला दोन वर्षे अध्यक्ष नाही. दोन वर्षात सलगपणे अधिवेशन होत नाही. १९ दिवस झाले मुख्यमंत्री कामावर नाहीत.राज्यातील जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कुणीही उपलब्ध नाही.यापूर्वी राज्यात कधीही अशी स्थिती निर्माण झाली नव्हती. जनतेची कामे होत नाहीत. मात्र, पैसे कमावण्याचे काम मात्र जोरात सुरू आहे.गेल्या दोन वर्षात न चुकता एक काम झाले ते म्हणजे भ्रष्टचार, अशी या राज्याची स्थिती आहे.’’

Ediyed By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com