Vijay shivtare
Vijay shivtareSarkarnama

पार्थ पवारांविरोधात मी जनरल डायरसारखा लढलो; पण विधानसभेला माझ्या पाठीशी कोणीही नव्हते

मला खुलं आव्हान देऊन पडलं असलं तरी मनपा निवडणुकीमध्ये मी सर्व प्रयत्न करणार आहे.

सागर आव्हाड

पुणे : मावळ लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी जनरल डायरसारखा लढलो आणि पार्थ पवार यांचा पराभव केला. मात्र, मी विधानसभेला उभा होतो, तेव्हा माझ्या मागे कोणी उभे राहिले नाही, अशी खंत शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केली. (No one behind me in the Assembly elections : Vijay Shivtare )

पुण्यात खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना पुणे शहर व बारामती लोकसभा पदाधिकारी यांची आढावा बैठक झाली. त्यात बोलताना विजय शिवतारे यांनी वरील खंत व्यक्त केली. पुण्यात आज वडगाव शेरी या ठिकाणी पदाधिकारी आढावा बैठक झाली. या बैठकीत खासदार संजय राऊत, उपसभापती नीलम गोऱ्हे, सचिन आहेर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. आगामी पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी माजी मंत्री शिवतारे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Vijay shivtare
‘एनडीए’ नेत्यांच्या पंक्तीत उद्धव ठाकरेंना मानाचे पान

सर्व सामान्य कार्यकर्त्याला पुणे जिल्हा सहकारी बँकेत स्थान मिळत नाही. मी पार्थ पवार यांच्या विरोधात मावळमध्ये प्रचार केला, तर मला खुलं आव्हान देऊन पडलं असलं तरी मनपा निवडणुकीमध्ये मी सर्व प्रयत्न करणार आहे, अस सांगत एकहाती सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुरंदरची खुमखुमी मी पुणे महापालिकेत दाखवून देऊ इच्छितो, असं म्हणत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच आव्हान देऊन इशारा दिला. पुणे जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न काँग्रेस व राष्ट्रवादीकडून सुरू आहे. त्यामुळे कोणाच्या जीवावर भगवा फडकणार, त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांना पाठबळ द्या, अशी विनंती करतो, असेही शिवतारे यांनी सांगितले

Vijay shivtare
...तर शिवाजीराव आढळराव पाटील आज लोकसभेत असते!

आदित्य शिरोडकर म्हणाले की, पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक वॉर्डात आढावा घेतला आहे, त्यानंतर पालिकेत कसे लढायचे, याचे धोरण ठरवू.

शिवसैनिक चळवल्या असला पाहिजे. शिवसेनेला शांतता परवडणारी नाही. आपण चळवळ केली की विरोधी गटात शांतता पसरते. पुण्याने आमदार दिले, परंतु आज शिवसेनेत मरगळ का? मरगळ झटकून टाका, कितीचाही प्रभाग झाला तरी आम्ही पुणे महापालिकेवर भगवा फडकवू, असे रवींद्र मिर्लेकर यांनी आशावाद व्यक्त केला.

माजी मंत्री सचिन अहिर म्हणाले, महाविकास आघाडीत अडचणी, उणिवा असल्या तरी आपला नेता प्रमुख पदावर आहे, याचे समाधान आहे. आता आपटबार वाजवून चालणार नाही, आता मोठा बार वाजवावा लागेल. आघाडी करताना सन्मानपूर्वक होत असेल तर करू. आघाडी अपमानित होऊन करणार नाही. शिवसेनेला प्रामाणिक लोक हवेत, गुंठेवारीचा आणि त्यातील त्रुटींचा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्यामार्फत शिवसेना सोडवणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com