Rohit Pawar : कितीही स्वप्नं बघा पवार कुटुंबीय फुटणार नाही : रोहित पवारांनी ठणकावले

समाजात आणि राजकारणात भांडणं लावणारे अनेक जण भेटतील
Rohit Pawar
Rohit Pawar

Rohit Pawar : कुटुंब एक राहणं ही त्या कुटुंबाची खरी ताकद असते. पण राजकारणात (Politics) अनेकांनी पवार कुटुंबीयांना स्वप्नात कधीच तोडलं आहे. पण लोकांनी स्वप्नात कितीही तोडलं तरी आम्ही एक आहोत, पवार कुटुंब एक आहे, असा विश्वास व्यक्त करत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी, विरोधकांना सुनावलं आहे.

रोहित पवार आज राजगुरुनगर येथील नवरंग कलेक्शन कपड्याच्या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगीबोलत होते. ''गेल्या काही दिवसांत सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून पवार कुटुंबात फुट पडल्याचे दावे केले जात आहे. हे सर्व दावे धुडकावून लावत रोहित पवार यांनी सुनावलं आहे. समाजात आणि राजकारणात भांडणं लावणारे अनेक जण भेटतील. कारण त्यांचं भांडणं लावल्याशिवाय काही शिजतच नसतं, कारण त्यांना सकारात्मक काही दिसत नाही. त्यातुन भांडणं लावुन कुटुंब फोडण्याचे काम त्यांच्याकडून सुरु असल्याचा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. पण आपण कुटुंब एक ठेवुन व्यवसायांचा विस्तार करा, असा सल्लाही पवारांनी दिला.

Rohit Pawar
Eknath Shinde : फ्रीजमधले खोके कोणी पचवले, हे ते जनतेसमोर येईल ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना इशारा

महाराष्ट्राने संपुर्ण देशाला दिशा दिली. पण आज महाराष्ट्राचा वापर इतर राज्यांच्या निवडणुकांसाठी केला जातोय की काय असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. राजगुरुनगर इथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. हाच प्रश्न आज आपली खरी अस्मिता आहे आणि ती टिकवण्यासाठी जे काही आपल्याला जे काही करायचं आहे ते करावचं लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, काल (२६ नोव्हेंबर) उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करत महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या हाकेला रोहित पवारांनी दुजोरा दिला. राज्यातल्या युवकांचे भविष्य घडवणा-या नोकऱ्या आज राज्यातून बाहेर जात आहे. हीच खदखद आज तरुणांच्या मनात आहे. अशा परिस्थितीत एक दिवस युवकच आपले व्यवसाय बंद ठेवुन महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होतील, इतकेच नव्हे तर, महाराष्ट्राची जनताही युवकांच्या या बंदला मोठा प्रतिसाद देईल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com