`कोरेगाव भीमा दंगल : संभाजी भिंडेविरोधात कोणताही पुरावा नाही`

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्याविरोधात कोणताही पुरावा मिळून आला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे
Sambhaji Bhide
Sambhaji Bhidesarkarnama

पुणे : भीमा-कोरेगाव येथे दंगली (Bhima-Koregaon riot) प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या विरोधात पोलिस तपासात कोणताही पुरावा आढळलेला नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Police) राज्य मानवी आयोगाला याबाबतची माहिती दिली.

दंगली प्रकरणात चाळीसहून अधिक जणांवर गुन्हे असून, काही महिन्यांपूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास केला. यामध्ये संभाजी भिडे यांच्याविरोधात कोणताही पुरावा मिळून आला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आलेला नाही. इतर आरोपींच्या विरोधात शिवाजीनगर न्यायालयात (Court) दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे, असे भिडे यांचे वकील ऍड. पुष्कर दुर्गे यांनी सांगितले.

Sambhaji Bhide
'बाबरी पाडताना देवेंद्र फडणवीस तेथेच होते, त्याला मी साक्षीदार आहे...'

याबाबत दाखल गुन्ह्यात नमुद आरोपी यात्रा सदर गुन्हयामध्ये सहभाग असणे अगर कट रचने बाबत बारकाईने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष साक्षीदार तपासण्यात आले आहे. तसेच पुरावे मिळण्याचे दृष्टीने बारकाईने तपास करूनही भिडे यांच्या विरुद्ध कोणताही ठोस पुरावा किंवा गुन्ह्यात सहभागाबाबत साक्षिदार मिळुन येत नाही. तसेच गुन्हा घडला त्यावेळी आरोपी हा सांगली जिल्ह्यात उपस्थित असल्याबाबत साक्षिदार सांगत आहे. त्यामुळे तपासाअंती भिडे यांच्याविरुद्ध दोषारोप ठेवता आले नाही, असे पोलिसांनी सादर केलेल्या माहितीत नमूद केले आहे.

Sambhaji Bhide
सध्याची प्रभागरचनाच कायम : जुलैमध्ये उडणार पालिका, ZP निवडणुकांचा बार

या प्रकरणात काही महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या दोषारोपपत्रात भिडे यांच्या विरोधात कुठलाही पुरावा सापडला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख आरोपी म्हणून दोषारोप पत्रात करण्यात आलेला नाही, अशी माहितीही भिडे यांचे वकील अॅड. पुष्कर दुर्गे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com