अजितदादांच्या प्रश्नावर देहू संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे संतापले...

राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी अभिषेकासाठी लागणारे अभिषेक पात्र, मखर, सिंहासन असे २१ किलो चांदीतून बनवले आहे.
Anna Bansode, Vilas Lande & Nitin Maharaj More
Anna Bansode, Vilas Lande & Nitin Maharaj MoreSarkarnama

पिंपरी : देहू (Dehu) (ता.हवेली,जि.पुणे) येथील संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) संस्थानच्या शिळा मंदिराचे नुकतेच (ता.१४ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी राजशिष्टाचार तथा प्रोटोकॉल डावलून स्थानिक लोकप्रतिनिधींना व्यासपीठावर बसू न देण्यात आल्याने या कार्यक्रमाला वादाचे गालबोट लागले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाषण करू न दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) रडारवर हा सोहळा गेला. दोन दिवसानंतरही त्याचे कवित्व संपले नसल्याचा प्रत्यय गुरुवारी (ता.१६ जून) पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा आला. (Ajit Pawar Latest Marathi News)

Anna Bansode, Vilas Lande & Nitin Maharaj More
देहूच्या कार्यक्रमाचा प्रोटोकॉल फडणवीस आणि भोसलेंनी बदलला...

उपमुख्यमंत्र्यांना का बोलू दिले नाही, असे देहूतील कार्यक्रमाचे आय़ोजक आणि संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे यांना आज चिंचवडमधील एका पत्रकापरिषदेत विचारले असता ते भडकलेच. रागारागातच ते पत्रकापरिषद सोडून जाऊ लागले. ही परिषद बोलावलेले पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे तसेच भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी समजूत घातल्याने नितीनमहाराज पुन्हा खुर्चीत बसले. मात्र, शांत व संयमी किर्तनकार मोरे महाराज एवढे संतप्त झाल्याने त्याची चर्चाही झाली.

त्याचे असं झालं की २० तारखेला देहूतून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणाऱ्या तुकोबारायांच्या पालखीच्या दररोजच्या पहाटेच्या अभिषेकासाठी लागणारे अभिषेक पात्र, मखर, सिंहासन असे पुजा साहित्य आ. बनसोडे यांनी २१ किलो चांदीतून बनवले आहे. १८ तारखेला त्याची मिरवणूक काढून त्याची विधीवत पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर ते येत्या सोमवारी (ता.२० जून) अजित पवार यांच्या हस्ते संस्थानकडे पालखी प्रस्थानापूर्वी देहू येथे सुपूर्त केले जाणार आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी बनसोडेंनी ही पत्रकारपरिषद त्यांच्या चिंचवड येथील जनसंपर्क कार्यालयात बोलावली होती. तिला मोरे महाराज तसेच संजय महाराज मोरे, पुंडलिक महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, शेखर महाराज कुटे आदी उपस्थित होते.

Anna Bansode, Vilas Lande & Nitin Maharaj More
सदाभाऊ, आधी हॉटेलची उधारी द्या; मगच पुढं जावा : सांगोल्यात खोतांना अडवले!

यावेळी त्यांना दोन दिवसांपूर्वी देहू संस्थानने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पवारांना का बोलू दिले नाही, असे विचारले असता नितीन महाराज चिडले. हा प्रश्न तुम्ही पवारांना का विचारत नाही, अशी उलट विचारणा त्यांनी हा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाच केली. तसेच ही पत्रकार परिषद कशासाठी आयोजित केली आहे, असे म्हणत हा प्रश्न विचारण्याची ही जागा नसल्याचे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com