माझ्या पोटातील पाणीही हलले नाही पाहिजे.. नाहीतर काम उखडून टाकीन : नितीन गडकरींची तंबी - nitin gadkari warns officials for kwality work of fly over in Pune | Politics Marathi News - Sarkarnama

माझ्या पोटातील पाणीही हलले नाही पाहिजे.. नाहीतर काम उखडून टाकीन : नितीन गडकरींची तंबी

ब्रिजमोहन पाटील
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

आम्ही `मालपाणी`वाले लोक नाहीत, त्यामुळे काम व्यवस्थितच पाहिजे, असा इशारा नितीन गडकरी यांनी दिला. 

पुणे : आपल्या बेधडक बोलण्याबद्दल प्रसिद्ध असेलेले केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी आपली शैली पुन्हा पुण्यात दाखवून दिली. पुण्यातील चांदणी चौक परिसरातील रखडलेल्या उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी केली. या वेळी उपस्थित ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीला त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत खडसावले.

याच कंपनीला नागपूरमधील उड्डाण पुलाचे काम मिळाले होते. त्याचा दाखला देत गडकरी म्हणाले की नागपूरमध्ये उड्डाणपुलांच्या ज्वाईंटचे काम निकृष्ट केले, तसे काम इथे केले तर मी सगळेच तुमचे काम उखडून टाकून, असा इशा दिला. मला येथे असले काम चालणार नाही. चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घटनापूर्वी मी त्याची तपासणी करणार आहे. माझ्या पोटातील पाणी देखील हलले नाही पाहिजे. आम्ही `मालपाणी`वाले लोक नाहीत, त्यामुळे काम व्यवस्थितच पाहिजे. महापालिका, वाहतूक पोलिसांची मदत घेऊन लवकर काम संपवा, अशा शब्दांत गडकरी यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीत सुनावले.

संरक्षण खाते हे सरकारी प्रकल्पांसाठी जमिनी देताना कशा प्रकारे अडथळा आणते याचा किस्सा त्यांनी ऐकवला. संरक्षणंत्री राजनाथसिंह यांच्याशी बैठका झाल्यानंतरही खालचा अधिकारी त्याच्या पद्धतीने आदेश देत असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. या उड्डाणपुलाच्या कामात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनिची (एनडीए) जागा जाणार आहे. त्याबदल्यात त्यांना १७ कोटी रुपये द्यायचे आहेत, पण जागाच ताब्यात येत नसल्याने कामास उशीर होत असल्याचे बैठकीत समोर आले. त्यावेळी गडकरी यांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांना तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का अशी विचारणा केली. त्यावेळी या अधिकाऱ्यांनी आम्ही जमीन देण्यास तयार आहोत असे सांगितले. यावर गडकरींनी तुमच्या वरिष्ठांशी बोलून घेण्याच्या सूचना दिल्या. ``संरक्षण मंत्रालयातील सचिव आणि त्यांचे दोन नंदी अर्धवट आदेश काढत असल्याने व डबल मोबदला मागत असल्याने अडचणी येत आहेत. तुम्हाला पैसै हवे असतील तर पैसे देतो किंवा बांधकाम करून पाहिजे असेल तर ते देखील देऊ, पण दोन्ही गोष्टी मिळणार नाहीत. तसेच दिल्लीतील अधिकाऱ्यांसोबत बैठक लावा,`` अशा सूचनाही गडकरी यांनी दिल्या.

जमीन अधिग्रहणामुळे चांदणी चौकातील उड्डाणपुलास दीड वर्ष उशीर झालेला असला तरी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका, पोलिस यांच्या मदतीने दिवसरात्र काम करा आणि वर्षभराच्या आत काम पूर्ण करा असे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह (एनएचएआय) ठेकेदाराला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.

चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम आॅगस्ट २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षीत होते, पण आता ठेकेदाराने जानेवारी २०२३ ची मुदत दिली आहे. पण काही करून हे काम वर्षभरात पूर्ण करा असे आदेश आज गडकरी यांनी दिले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख