Pune Crime| पुण्यात निर्मला सीतारमण यांच्या फोटोला काळे फासले

Nirmala Sitaraman| कालच 'आप'च्या कार्यकर्त्यांनी वारजे येथे निर्मला सीतारमण यांचा ताफा अडवल्याची घटना घडली.
Nirmala Sitaraman|
Nirmala Sitaraman|

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) या दोन दिवसापासून बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. पण त्यांच्या या दौऱ्यातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या फोटोला काही अज्ञातांनी काळे फासल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार काही अज्ञातांनी काल रात्री केल्याची माहिती आहे.

धनकवडी भागात शिवछत्रपती सभागृह येथे उभारण्यात आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या कमानीवरील फोटोला काळे फासण्यात आले आहे. खडकवासला विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांचा देखील या कमानीवर फोटो होता.पण त्यांच्या फोटोंना काळे कोणी फासले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

Nirmala Sitaraman|
मुख्यमंत्री नव्हे तर श्रीकांत शिंदेंच महाराष्ट्राचे 'सुपर सीएम'; राष्ट्रवादीकडून 'तो' फोटो व्हायरल...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांचा ताफा 'आप'च्या कार्यकर्त्यांनी वारजे येथे अडवल्याची घटना घडली. महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी, जनविरोधी आर्थिक धोरणे याचा निषेध करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अर्थमंत्री सीतारामन यांच्या गाडीचा ताफा अडवला. यात आपचे वारजे माळवाडी भागातील कार्यकर्ते निलेश वांजळे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. यावेळी महागाई विरोधात, केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात व ऑपरेशन लोटस विरोधात घोषणा देण्यात आल्या. यानंतर आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बारामती लोकसभेची जागा जिंकण्यासाठी भाजपने (bjp)कंबर कसली आहे. निर्मला सीतारमण भाजपच्या (BJP) मिशन बारामती (Baramati) अभियानाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी सीतारमण बारामती दौऱ्यावर आल्या आहेत. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जागा जिंकण्याचा त्यांचा हा गंभीर प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

पक्षाच्या मिशन 45 चा एक भाग म्हणून, भाजपने सीतारमण यांना बारामतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि पवारांना त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्याची प्रमुख भूमिका सोपवली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक स्थितीचा आणि कामांचा आढावा घेणार आहेत. सध्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com