Baramati Politics| बारामतीसाठी सितारमण यांच्याकडून फक्त चार तासांचा वेळ

Baramati Politics| Nirmala Sitaraman| निर्मला सीतारमण बारामतीत दाखल
Baramati Politics| Nirmala Sitaraman|
Baramati Politics| Nirmala Sitaraman|

बारामती : बारामती लोकसभेची जागा जिंकण्यासाठी भाजपने (bjp) कंबर कसली आहे. निर्मला सीतारमण भाजपच्या (BJP) मिशन बारामती (Baramati) अभियानाला सुरुवात झाली. त्यासाठी सीतारमण बारामती दौऱ्यावर आल्या. पण या दौऱ्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बारामती दौऱ्यात निर्मला सीतारमण या बारामती शहरासाठी फक्त चार तासांचा वेळ देणार आहेत.

असा आहे निर्मला सीतारमण यांचा बारामती दौरा...

आज सकाळी आठ साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांचा बारामती दौऱ्याला सुरुवात झाली. सर्वात आधी त्यांनी जेजुरीतील खंडोबाचे दर्शन घेतले. सकाळी साडेनऊ वाजता त्यांनी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य सरपंच व अन्य लोकप्रतिनिधींबरोबर संघटनात्मक कार्यक्रम घेतला. त्यानंतर त्यांनी बारामतीतील मोरगाव येथील त्यांनी श्री मयुरेश्वर अष्टविनायक मंदिरात बाप्पांचे दर्शन घेतले.

Baramati Politics| Nirmala Sitaraman|
Pune Crime| पुण्यात निर्मला सीतारमण यांच्या फोटोला काळे फासले

बाप्पाच्या दर्शनानंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी बारामती लोकसभा मतदार संघात त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी भाजप नेते बाळासाहेब गावडे यांच्या घरी दुपारचे जेवण केले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बारामतीतील मुक्ताई लॉंस येथे सामाजिक कार्यकर्ते, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, व्यापारी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

रात्री सात वाजता इंदापूर शहरातील बुद्ध विहारास भेट देणार आहेत. रात्री आठ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात जातील. रात्री नऊ वाजता भाजप नेते ललेंद्र शिंदे यांच्या घरी जेवण आणि रात्री दहा वाजता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री निवासस्थानी मुक्कामी असतील, अशी माहिती आहे.

Baramati Politics| Nirmala Sitaraman|
Shivsena: नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवर हजेरी!

सीतारमण यांच्या बारामती दौऱ्याला गालोबोट....

निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्याला गालबोट लागल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या फोटोला काही अज्ञातांनी काळे फासल्याची घटना घडली. काही अज्ञातांनी काल रात्री हा प्रकार केल्याची माहिती आहे.धनकवडी भागात शिवछत्रपती सभागृह येथे उभारण्यात आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या कमानीवरील फोटोला काळे फासण्यात आले आहे.

खडकवासला विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांचा देखील या कमानीवर फोटो होता.पण त्यांच्या फोटोंना काळे कोणी फासले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. तर कालदेखील 'आप'च्या कार्यकर्त्यांनी वारजे येथे निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांचा ताफा अडवत घोषणाबाजी केली. महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी, जनविरोधी आर्थिक धोरणे याचा निषेध करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सीतारमण यांच्या गाडीचा ताफा अडवला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com