
पुणे : सहकाराचा राजकारण करणाऱ्यांनी कधीही केंद्रीय सहकार मंत्रालय (Cooperation Ministry) बनविण्याचा प्रयत्न केला आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सहकार मंत्रालय बनवलं. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सहकाराचे क्षेत्र आहे. सहकाराचा कधीही राजकारणासाठी उपयोग केला नाही पाहिजे, असे सांगणाऱ्या मोठ्या नेत्यानेही आतापर्यंत स्वतंत्र सहकार मंत्रालय बनवलं नाही, अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव न घेतला टोला लगावला. (Nirmala Sitharaman criticizes Sharad Pawar without naming)
केंद्रीय मंत्री सीतारामन या बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्याचा दौरा केला. त्यानंतर पुण्यात आज (ता. २४ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी सहकार मंत्रालयावरून नाव न घेता पवारांवर निशाणा साधला.
सीतारामन म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या योजनांबाबत लोकांना भेटले. केंद्र सरकारच्या योजनांबाबत जनजागृती केली. भारतीय जनता पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी मी आली आहे. त्यासोबतच केंद्र सरकारच्या योजना पोहचण्यासाठी मी बारामतीत आले आहे. बारामतीमध्ये भाजपचे संघटन चांगलं आहे. सेवाभावी वृत्तीने भाजपचे कार्यकर्ते काम करत आहेत. कोविडच्या काळात भाजपकडून जेवढे काम झाले, तेवढे काम अन्य कोणत्याही पक्षाकडून झालेले नाही. भाजपच्या सेवा सेलचे कार्यकर्ते कोविडपासून आजपर्यंत मैदानात उतरून काम करताना दिसत आहेत.
भारतीय जनता पक्षासाठी फक्त बारामतीच नाही तर प्रत्येक मतदारसंघ प्रतिष्ठेचा आहे. त्या मतदारसंघात पक्षाकडून काम करण्यात येत आहे. केंद्र सरकारची योजना शंभर टक्के लोकांपर्यंत पोचविण्यावर आमच भर आहे. लोहगाव (पुणे) विमानतळाचे उर्वरीत काम मार्च २०२३ पर्यंत होईल. आतापर्यंत या विमानतळाचे काम ७० टक्क्यांपर्यंत झाले आहे, उर्वरीत काम येत्या मार्चपर्यंत होईल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.