शिरूरमधील दोघांपैकी कोणाला लागणार मंत्रीपदाची लॉटरी?

निरंजन डावखरे आणि मेघना बोर्डीकर-साकोरे यांची नावे मंत्रीपदासाठी चर्चेत
Niranjan Davkhare - Meghna Bordikar-Sakore
Niranjan Davkhare - Meghna Bordikar-SakoreSarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) : शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार आणि खेडचे आमदार दिलीप मोहिते या दोघांपैकी एकाला महाआघाडी सरकारमध्ये मंत्रीपद मिळण्याची शक्यता सरकार स्थापन करतानाच बोलली गेली होती. दोघांच्या बाबतीत पक्षश्रेष्ठी विशेषत: तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुकुल असल्याचे बोलले जात असतानाच आता शिंदे सरकार आल्याने शिरुर-हवेली व खेडकरांचे मंत्रिपदाचे स्वप्न तूर्तास तरी हवेत विरले आहे. सरकार बदलले असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गोटातील निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) आणि मेघना बोर्डीकर-साकोरे (Meghna Bordikar-Sakore) यांची वर्णी लागण्याची शक्यता त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे. (Niranjan Davkhare and Meghna Bordikar-Sakore's name disscued for the ministry post)

शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार आणि खेडचे आमदार दिलीप मोहिते या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कट्टर आमदारांना महाआघाडी सरकारच्या स्थापनेनंतर मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात होती. दोघेही अजित पवार यांच्या अगदी मर्जीतले असल्याने दोघांपैकी कुणाची वर्णी लागतेय, अशी अनेक दिवसांची प्रतिक्षा दोन्ही मतदार संघात होती. मात्र, एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि त्यांना भाजपने दिलेली साथ यामुळे महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले. त्यानंतर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनले आहेत. त्यामुळे फडणवीस आपल्या गोटातील दोन सहकाऱ्यांना मंत्रीपद देणार का? याकडे तालुक्यातील जनतेला आशा लागल्या आहेत.

Niranjan Davkhare - Meghna Bordikar-Sakore
विधानसभा अध्यक्षपदासाठी विखे पाटील, बागडे, केसरकरांची नावे आघाडीवर!

डावखरे-शिंदे-फडणवीस यांचे ऋणानुबंध!

दिवंगत वसंतराव डावखरे यांनी शिरूर तालुक्यातील हिवरे येथून आई-वडिलांसोबत ठाण्यात स्थलांतरित झाले. त्या ठिकाणी सुरुवातीला भाजीविक्री करत ठाण्याचे नगरसेवक, महापौर, तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांचे पीए, विधान परिषदेचे १७ वर्षे उपसभापती असा जीवनप्रवास डावखरे यांनी आनंद दिघे यांच्याशी मैत्री जपत केला. या मैत्रीमुळेच डावखरे यांचे राजकारणही रंजक राहिले. डावखरे-दिघेंच्या मैत्रीत आणखी एक जिवलग मैत्रीचा कंगोरा होता. तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. या पार्श्वभूमीवर डावखरे यांचे चिरंजीव निरंजन डावखरे हे २०१६ मध्ये भाजपत जाऊन विधान परिषदेचे आमदार झाले. डावखरे-शिंदे-फडणवीस एकत्र असल्याने निरंजन यांची मंत्रीपदाची शक्यता अधिक असल्याचे डावखरेंचे निकटवर्तीय दावा करीत आहेत.

Niranjan Davkhare - Meghna Bordikar-Sakore
धनंजय मुंडेंनी मध्यरात्री घेतली फडणवीसांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास खलबतं!

मेघना बोर्डीकर यांच्या नावाचीही चर्चा

चार वेळा विधानसभेत व एक वेळ विधान परिषद जिंकणारे रामप्रसाद बोर्डीकर यांचा परभणी जिल्ह्यावर आजही प्रभाव आहे. बोर्डीकर हे १९८५ पासून जिंतूर पालिका, पंचायत समिती, बाजार समिती ते थेट मुंबई बाजार समितीचे सभापतिपदापर्यंत पोचले आहेत. बोर्डीकर यांच्या राजकीय उत्तराधिकारी म्हणून मेघना बोर्डीकर राज्याच्या राजकारणात उतरल्या आहेत. त्या परभणीत सक्रीय असल्या तरी त्या शिरूर तालुक्यातील केंदूर गावातील साकोरे परिवाराच्या सूनबाई आहेत. साकोरे परिवारासह दिवंगत बापूसाहेब थिटे यांचे चिरंजीव राजेंद्र थिटे हेही भाजपावासीय झाले आहेत. आमदार बोर्डीकर यांचे पती दीपक साकोरे यांच्यासह त्यांच्या परिवारातील अनेकजण मंत्रालय स्तरावर उच्चाधिकारी आहेत. या दोघांची फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक पाहता शिरूरकरांसाठी बापूसाहेब थिटेंनंतर पुन्हा एकदा मंत्रीपद मिळेल, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in