बारावीच्या मूल्यमापनासाठी नववी-दहावी-अकरावीची कामगिरी येणार मदतीला

येत्या काही दिवसात हा ‘फार्म्युला’ अंतीम करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
gaikwad.jpg
gaikwad.jpg


पुणे : सीबीएसईच्या निर्णयाची री ओढत बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. निकाल जाहीर करण्यासाठी विद्यार्थ्यांचे अतंर्गत मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नववी ते अकरावी तसेच बारावीमधील कामगिरीच्या आधारे मूल्यमापन करण्यात येणार असून येत्या काही दिवसात हा ‘फार्म्युला’ अंतीम करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.(The ninth-tenth-eleventh performance will come in handy for the assessment of the twelfth)


कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी घेतला.‘सीबीएसई’च्या निर्णयानंतर इंडियन स्कूल सर्टिफिकेट (आयएससी) बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ राज्य मंडळानेही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने याआधीच जाहीर केला आहे. परीक्षेऐवजी अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर कण्यात येईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. मूल्यमापनाची पद्धती काय राहील त्याचा तपशीलदेखील राज्य सरकारने गेल्या आठवड्यात जाहीर केला आहे. दहावीचा निर्णय पूर्णपणे राज्य सरकारच्या हाती होता. मात्र, बारावीनंतरचे अभ्यासक्रम व त्यासाठी होणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा या केंद्र सरकारशी संबंधित असल्याने सीबीएसई बोर्डाचा काय निर्णय होतो. त्यावर राज्याचा निर्णय अवलंबून होता.

परीक्षा रद्द झाल्यानंतर आता बारावीत उत्तीर्ण करताना कोणता निकष लावायचा.मूल्यमापन नेमके कोणत्या पद्धतीने करायचे याचा फॉर्म्युला येत्या काही दिवसात अंतीम करून जाहीर करण्यात येणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार नववी, दहावी, अकरावी व बारावीच्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करण्यात येणार आहे.ज्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करायचे आहे. त्यामधील बहुतांश मुलांच्या अकरावीच्या सर्व विषयांच्या परीक्षेदेखील पूर्ण होऊ शकल्या नाहीत. केवळ नववी व दहावीचे गुण व तसेच अकरावची वर्षभरातील कामगिरी व बारावीतील ऑनलाइन झालेल्या परीक्षांच्या आधारे मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यात बारावीचे सुमारे १४ लाख तर दहावीचे सुमारे साडेसोळा लाख विद्यार्थी आहेत.या सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्यात आले असले तरी दोन्ही वर्गांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यासाठी काही अवधी लागणार असून हे काम वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान शाळा व राज्यमंडळासमोर आहे.
Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com