नऊशे शेतकरी MIDC ला देणार ३७२ एकर क्षेत्र; आमदार बोर्डीकरांच्या मध्यस्थीने होणार बैठक

Shikrapur : गेल्या १४ वर्षांपासून केडीएल कंपनी ही केवळ कागदोपत्री रंगविली गेली
Shikrapur Farmers News
Shikrapur Farmers NewsSarkarnama

शिक्रापूर : खेड एसईझेड (SEZ) मधील बाधित शेतक-यांचे ३७२ एकर एवढे १५ टक्के परतावा क्षेत्र हे एमआयडीसीला (MIDC) देण्याचा निर्णय करण्यात आला आहे.

यासाठी शेतक-यांनी नुकतेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री व एमआयडीसीचे सीईओ यांना पत्र दिले असून याबाबत लवकरच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठक करण्याचा निर्णय शेतक-यांच्या वतीने केंदूर (ता. शिरूर) येथील बैठकीत घेण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे (MLA Meghana Bordikar) यांच्याकडून बैठक समन्वय होत असल्याचेही शेतक-यांनी सांगितले. (Shikrapur Farmers News)

Shikrapur Farmers News
मंत्री सावंतांची तत्काळ हकालपट्टी करा...

खेड एसईझेड प्रकल्पासाठी सन २००८ मध्ये केंदूर (ता.शिरूर), दावडी, निमगाव, कनेरसर, गोसासी या पाच गावांतील सुमारे १२२२ हेक्टर एवढे क्षेत्र संपादित करुन प्रतीएकर ६ लाख ८० हजार असा दर देवून संपादीत करण्यात आले. पुढे पुनर्खरेदी योजनेमध्ये प्रत्येक शेतक-याचे १५ टक्के एवढे विकसित क्षेत्र पुन्हा शेतक-यांना परत देण्यासाठी प्रती हेक्टर २५ लाख ५० हजार रुपयांप्रमाणे पैसेही वजावट करुन घेतले गेले व तशा परतावा क्षेत्राच्या पावत्याही देण्यात आल्या. पुढील काळात व्यक्तिगत क्षेत्र देता येणार नाही म्हणून शेतक-यांची खेड डेव्हलर्पस लिमिटेड (केडीएल) कंपनी स्थापन करण्यात आली. मात्र गेल्या १४ वर्षांपासून हे विकसीत क्षेत्र ना शेतक-यांना दिले गेले नव्हते ते नुकतेच वर्ग करण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर केडीएलची वार्षिक सर्वसाधारण सभा पुण्यात पार पडली. या सभेत मोठा गदारोळ होत शेतक-यांना अंधारात ठेवून सर्व निर्णय घेतले जात असल्याचा आरोप खेड डेव्हलपर्स (केडीएल) कंपनीवर शेतक-यांनी केला व सभा उधळून लावत कुठलेच ठराव पारीत होवू दिले नाही. तथापी सभेत सर्व ठराव मंजुर झाल्याची खोडसाळ वृत्ते कंपनीकडून सोशल मिडीयासह काही वृत्तपत्रांमध्ये एकतर्फीपणे देण्यात आल्याचाही आरोप या बैठकी करण्यात आला.

Shikrapur Farmers News
पिचड पिता-पुत्रांना पुन्हा पराभवाचा धक्का; उरली-सुरली सत्ताही हिसकावली

वस्तुत: गेल्या १४ वर्षांपासून केडीएल कंपनी ही केवळ कागदोपत्री रंगविली गेली अन कंपनीचे सर्व खर्च शेतक-यांच्या माथी मारले गेलेत. याच पार्श्वभूमीवर आता वरील चार गावांतील बाधित शेतक-यांनी नुकतीच एक विशेष बैठक केंदूर (ता.शिरूर) येथील दत्त मंदिरात घेवून खेड एसईझेड मधील सुमारे ९१७ बाधित शेतक-यांचे ३७२ एकर एवढे १५ टक्के परतावा क्षेत्र हे एमआयडीसीला देण्याचा निर्णय जाहीर केला.

याबाबत तसेच निर्णय पत्रक नुकतेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे पाठविले असून वरील सर्व मान्यवरांसोबत लवरच बैठक मुंबईत घेण्याचे ठरविल्याचेही बाधित शेतक-यांच्या वतीने बाळासाहेब माशेरे, मोहन दौंडकर, सुदाम माशेरे, संतोष दौंडकर (कनेरसर), उत्तम कान्हुरकर, भानुदास नेटके (दावडी), एकनाथ गोरडे (गोसासी), विश्वास कदम (निमगाव), अ‍ॅड. सुनिल लिमगुडे, बाळासाहेब साकोरे, अभिजित साकोरे व विलासनाना थिटे (सर्व केंदूर) यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com