नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात...; निलेश राणेंनी शिवसनेला डिवचले

Shivsena-rane controversy| उद्धव ठाकरे सत्तेत असताना घेतलेल्या मुलाखतीचा फोटो आणि सत्ता गेल्यानंतर घेतलेल्या मुलाखतीचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे.
Nilesh rane
Nilesh rane

पुणे : शिवसेना खासदार आणि दैनिक सामना'चे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला. शिवसेना (Shivsena) कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार, शिंदे गटाकडून होणारे आरोप या सगळ्यांची उत्तर शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देणार आहेत.

Nilesh rane
President Of India : 25 जुलै लाच राष्ट्रपतींचा शपथविधी का होतो? हे आहे कारण

मात्र या टीझरवर भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. राऊतांनी शेअर केलेल्या टीझरचा फोटो शेअर करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ''उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात.'' असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे. तसेच, उद्धव ठाकरे सत्तेत असताना घेतलेल्या मुलाखतीचा फोटो आणि सत्ता गेल्यानंतर घेतलेल्या मुलाखतीचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे. शिवसेना-राणे वाद महाराष्ट्राला नवीन नाही. त्यातच ठाकरे सरकार कोसळ्यापासून राणे शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता या मुलाखतीवरुनही राणेंनी शिवसेनेला डिवचल्याचे दिसत आहे.

येत्या 26 आणि 27 जुलैला उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीचा दुसरा टिझर आज संजय राऊतांनी टि्वट केला आहे. या मुलाखतीत संजय राऊत सध्याची राजकीय परिस्थिती, जनतेच्या मनातील प्रश्नाबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले आहेत.

या मुलाखतीत “हम दो एक कमरे में बंद हो असं सध्याचं सरकार आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत. उद्धव ठाकरे राजीनामा द्यायला तयार होते का? आणि विश्वास दर्शक ठरावाला सामोरे गेले असते तर काय झालं असतं? हे जनतेच्या मनातील दोन प्रश्नांना ठाकरे यांनी काय उत्तर दिले हे उद्या आणि परवा पाहायला मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com