Nilesh Lankhe : विखे-पाटलांविरोधात नीलेश लंके लोकसभेला शड्डू ठोकणार? म्हणाले, पक्षाने...

Nilesh Lankhe : विखे पाटील मुख्यमंत्री झालेले आवडेल का? काय म्हणाले लंके?
Nilesh Lankhe : Sujay Vikhe Patil
Nilesh Lankhe : Sujay Vikhe PatilSarkarnama

Nilesh Lankhe : पुणे पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. उमेदवारांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराचा आता अंतिम आठवडा उरला आहे. यामुळे राज्यातील विविध पक्षांचे नेते पुण्यात आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते व आमदार निलेश लंके यांनी या प्रचारादरम्यान मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, "पक्षाचा आदेश आला तर नगरमधून खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या विरोधात निवडणूक लढवणार," यामुळे त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

निलेश लंके यांना सुजय विखे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारले असता ते म्हणाले, "शेवटी पक्ष मोठा असतो. आमच्या पक्षाचे नेते शरद पवार असो, आमचे नेते अजितदादा असो, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असो, जर यांनी उद्या मला आदेश तर मला लढाईला पुढे यावं लागेल.पक्षांच्या नेत्यापुढे कोणी नसतं. मी आदेशाचं पालन करणारा छोटा कार्यकर्ता आहे. जर उद्या पक्षाने सांगितलं तर काही गोष्टी कराव्या लागतील, असे सूचक विधान निलेश लंके यांनी केले आहे.

Nilesh Lankhe : Sujay Vikhe Patil
Sharad Pawar : ''भगतसिंह कोश्यारी गेले ते बरे झाले, पदाची प्रतिष्ठा वाढविण्यात ते अपवाद ठरले''

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्री पदाच्या शर्य़तीत असल्याचे वक्तव्य केले होते. यावर बोलताना लंके म्हणाले, "मी असं वक्तव्य पाहिलं नाही. चारपाच दिवस मी वैष्णोदेवीला होतो. पण मी माझी भूमिका याधीही जाहीर केलेलं आहे. माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री झालेला पाहायला मला आवडेल. यात मला आनंद आहे."

नगर जिल्ह्याच्या नामांतराबबात लंके म्हणाले, "नगर जिल्ह्यातील लोकांच्या मागणीला आमचं समर्थन आहे. नगरमधील अनेकांची मागणी आहे की अहिल्यानगर असे नामांतर व्हावं, याला आमचं समर्थन असणार आहे. महिलांना प्रकाशात आणण्याचं काम खऱ्या अर्थाने अहिल्यादेवींनी केले आहे. अनेक मंदिरे मस्जिद याचं जिर्णोद्धार करण्याचं काम त्यांनी केलं आहे. नामांतराला आमचं समर्थन आहे.

Nilesh Lankhe : Sujay Vikhe Patil
High Court News : `त्या` टीईटी शिक्षकांना दिलासा

पुण्याच्या पोटनिवडणुकीबाबत त्यांनी दोन्ही जागेवर विजयाचा दावा केला आहे. पोटनिवडणुकीबाबत लंके म्हणाले की, "कसबा आणि चिंचवड दोन्ही जागा आमच्या निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे. "

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com