PM Narendra Modi|
PM Narendra Modi|sarkarnama

PM मोदींच्या हत्येचा PFI ने रचला होता कट ; ईडीचा न्यायालयात दावा

PFI : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्यासाठी पीएफआयकडून प्रशिक्षण शिबिराची स्थापना करण्यात आली होती.

पुणे : एनआयए'व 'एटीएस'ने देशभरात पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) विरुद्धची सर्वात मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रात पुणे, मालेगाव, नवी मुंबई आणि भिवंडीसह विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले असून अनेकांना अटक करण्यात आली आहे. अनेक राज्यांत पीएफआयच्या सदस्यांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. (PM Narendra Modi News Today)

पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर तपास यंत्रणेने मोठा दावा केला आहे. कोझिकोडहून अटकेतील पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया कार्यकर्ता शफीक पायथे याच्या रिमांड नोटमध्ये अंमलबजावणी संचालय म्हणजे ईडीने (ED) म्हटले आहे की, पाटण्यात 12 जुलै रोजी पंतप्रधानांच्या सभेत हल्ल्याचा कट रचण्यात आला होता, ज्याच्या फंडिंगमध्ये शफीक पायथेही सामील होता.उत्तरप्रदेशातील इतर संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्याच्या कट रचला होता, असं तपास यंत्रणांकडून सांगण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्यासाठी पीएफआयकडून प्रशिक्षण शिबिराची स्थापना करण्यात आली होती. 2013 मध्ये इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित दहशतवाद्यांनी त्यांच्या रॅलीमध्ये स्फोटही घडवला होता. असंही ईडीकडून सांगण्यात आलं आहे.

PM Narendra Modi|
पुण्यात 'पाकिस्तान जिंदाबाद' च्या घोषणा ; PFI संघटनेच्या 100 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना अटक

हवालाच्या माध्यमातून पैसे गोळा करून PFIचे सदस्य ट्रेनिंग कॅम्प चालवतात. यासोबतच यांचे सदस्य देशभरातील अनेक गुन्हेगारी कृत्यांत सहभागी राहिलेले आहेत. एप्रिलपासूनच यांची चौकशी सुरू होती.कोचीत NIA कडून दाखल प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी PFIने तरुणांना लष्कर आणि ISIS सारख्या दहशतवादी संघटना जॉईन करण्यासाठी प्रोत्साहित केले.

एनआयएने दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रासह तेलंगाणा, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह इतर राज्यांमध्ये 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'शी संबंधित अनेक ठिकाणांवर मोठी कारवाई केली होती. आसाममध्ये पीएफआयशी संबंधित ९ जणांना ताब्यात घेतलं. तर तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशातही एनआयएने या महिन्याच्या सुरवातीला जवळपास ४० ठिकाणी छापे टाकले होते.

ED ने म्हटले आहे की..

  • PFIला खाडी देशातून फंडिंग होते. सर्व पैसे हवालाच्या माध्यमातून येतात.

  • आम्ही या वर्षी PFIचे 120 कोटी रुपये जप्त केले आहेत.

  • पायथे यानेही 40 लाख रुपये कतारहून ट्रान्सफर केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com