शहराध्यक्ष बदलाची बातमी ‘एप्रिल फूल’ सारखी

गेल्या काही दिवसापासून पुण्याचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना बदलण्यात येणार असल्याच्या बातम्या येत होत्या.
 शहराध्यक्ष बदलाची बातमी ‘एप्रिल फूल’ सारखी
Chandrakant Patil Sarkarnama

पुणे : पुणे अथवा मुंबईसह राज्यातील कोणत्याही शहराचा भाजपा शहराध्यक्ष बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट केले. शहराध्यक्ष बदलाची बातमी म्हणजे ‘एप्रिल फूल’ करण्यासारखी असल्याचे त्यांनी सांगितले.

 Chandrakant Patil
तुम्हाला प्रोटोकॉल समजत नाही का? : रासपचे रत्नाकर गुट्टे सीईओंवर संतापले!

पुणे आणि मुंबई शहराच्या अध्यक्ष बदलाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच पाटील म्हणाले ‘‘ आज एक एप्रिल आहे का ? एक एप्रिलला जशा बातम्या दिल्या जातात या प्रकारातील ही बातमी आहे. ते म्हणाले, ‘‘ पुणे-मुंबई असो वा राज्यातील अन्य कोणत्याही शहरचा अध्यक्ष बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.’’

 Chandrakant Patil
सदाभाऊ, आधी हॉटेलची उधारी द्या; मगच पुढं जावा : सांगोल्यात खोतांना अडवले!

गेल्या काही दिवसापासून पुण्यातील काही माध्यमांमध्ये पुण्याचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना बदलण्यात येणार असल्याच्या बातम्या येत होत्या. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला पाटील यांनी उत्तर देऊन नजीकच्या काळात पुणे-मुंबईसह राज्यातल्या कोणत्याही शहराचा अध्यक्ष बदलला जाणार नसल्याचे सांगितले. पुणे शहरात विद्यमान शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या जागी नवा चेहरा येईल, असा अंदाज बातम्यांमधून व्यक्त केला जात होता. मात्र, प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या आजच्या स्पष्टीकरणामुळे या साऱ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

 Chandrakant Patil
विखे पाटलांच्या त्या आमंत्रणाला अजितदादांनी धुडकावले : म्हणाले...

पुण्यासह राज्यातल्या जवळपास सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका येत्या सहा महिन्यात होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातच काय तर राज्यातल्या कोणत्याच जिल्ह्याचा अथवा शहराचा अध्यक्ष बदलण्यात येणार नसल्याचे पाटील यांच्या आजच्या स्पष्टीकरणातून समोर आले आहे.

पुण्यात विद्यमान शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे गेल्या जवळपास तीन वर्षापासून अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीच्या वेळी योगेश गोगावले हे पक्षाचे शहराध्यक्ष होते. त्यामुळे या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुळीक यांच्या जागी नवा शहराध्यक्ष आणला जाईल अशी चर्चा भाजपाअंतर्गत एका गटाने सुरू केली. त्यातून मुळीकांच्या बदलाची चर्चा सुरू झाली. मात्र, पाटील यांनी असा कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे आज पुन्हा एकदा स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in