Shiv sena Vs Shinde लढाई व्हाॅटस अप ग्रुपमध्ये! नीलमताईंना रिमूव्ह केले..

Shiv sena-Yuva sena group मधून गोऱ्हे यांना काढून टाकण्यात आले.
 Dr Neelam Gorhe
Dr Neelam GorheSarkarnama

पुणे : उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे या दोन गटांतील रस्त्यावरील लढाईचा पहिला अंक पुण्यातील कात्रज चौकात बुधवारी रात्री पाहावयास मिळाला. माजी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर या दोन गटांतील नेते आता एकमेकांवर चांगलेच खवळले आहेत. त्याचे पडसाद आता इतरत्र उमटू लागले आहेत.

 Dr Neelam Gorhe
उदय सामंत हल्ला : बबनराव थोरातांना अटक; 'गद्दारांच्या गाड्या फोडा' वक्तव्य अंगलट

पुण्यात Shivsena-Yuvasena पत्रकार मित्र या नावाने व्हाॅटस अप ग्रुप आहे. यात पुण्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते, पत्रकार यांचा समावेश आहे. शिंदे गट फुटल्यानंतर या ग्रुपमधील काही नेत्यांनी ठाकरेंना `जय महाराष्ट्र` केला. शिवसेनेत फूट पडून दीड महिना झाला असला तरी या ग्रुपमध्ये दोन्ही बाजूंचे नेते आपापल्या भूमिका मांडत होते. उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर मात्र परिस्थिती चिघळली आहे. त्यातून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना ग्रुपमधून काढण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी नियुक्त केलेले युवासेनेचे सचिव किरण साळी यांनी विधान परिषदेचे सभापती नीलम गोऱ्हे यांना या ग्रुपमधून टाकले काढून

किरण साळी यांनी २०१८ मध्ये शिवसेना - युवासेना पत्रकार मित्र असा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केलेला आहे. या ग्रुप मध्ये अनेक पत्रकरांसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि नेते मंडळी देखील आहेत. साळी हे पुण्यात गोऱ्हे यांचे निकटवर्तीय म्हणूनही वावरत होते. त्यामुळे गोऱ्हे यांचे ते शिष्यच मानले जात होते. नीलम गोऱ्हे यांनी या ग्रुपवर ॲक्टिव होत्या आणि राजकीय भूमिका सातत्याने मांडत होत्या. त्यामुळे त्यांना या ग्रुपवर ठेवणे साळींना अवघड गेले आणि त्यांनी गोऱ्हेंना रिमूव्ह केले.

 Dr Neelam Gorhe
उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला : आदित्य यांच्या सभेनंतर पुण्यात शिवसैनिक आक्रमक

साळी हे उदय सामंत यांचे पुण्यातील आता निकटवर्तीय बनले आहेत. काल सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर आता या दोन्ही गटातील वाद वाढल्याने शिवसेनेच्या नेत्यांना आता आपल्या ग्रुपमध्येही स्थान नको, असा निर्णय़ शिंदे गटाने घेतला असावा, असे यातून दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in