
''दिवंगत डॉ.पतंगराव कदम यांनी शुन्यातून विश्व निर्माण केलं. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये भारती विद्यापीठ या संस्थेच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले. आजही भारती विद्यापीठ संस्थेच्या माध्यमातून ते कार्य सुरू आहे. दिवंगत डॉ.पतंगराव कदम हे एक जिंदादील व्यक्तिमत्व होतं'', असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
भारती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि भारती विद्यापीठ पुणे विद्यार्थी गृहनिर्माण संकुलाचे उद्घाटन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान आज (ता. ८) पहिला डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले, ''ज्यांनी शुन्यातून विश्व निर्माण केलं. त्यांच्या नावाचा अर्थात डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार हा कोरोनाच्या काळात लसीकरणाच्या माध्यमातून विश्वाला वाचवण्याचे कार्य करणाऱ्या अदर पुनावाला यांना देण्यात आला ही अभिमानाची गोष्ट आहे'', असंही यावेळी ते म्हणाले.
''अदर पुनावाला यांनी लसीकरणाच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर भारताची ताकद दाखवून दिली. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही भारतात मोफत लसीकरण मोहिम राबवली. त्यामुळे आपल्या देशालाही मोठा फायदा झाला. चीन नंतर भारत सध्या चांगल्या प्रकारे स्टार्टअपकडे वाटचाल करत आहे'', असंही ते म्हणाले.
''भारती विद्यापीठ सारख्या संस्था अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतात. त्यामुळे अशा संस्थानी विदर्भाकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. आता विदर्भामध्ये पोहोचायला समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून पाच ते सहा तास लागतात. तर भारती विद्यापीठ सारख्या चांगल्या संस्थाच्या पाठीमागे उभ राहणं महत्वाचं'' असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू (Sukhvinder Singh Sukhu), सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम आणि भारती विद्यापीठाचे कुलपती प्रा.डॉ. शिवाजीराव कदम उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.