महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला बूस्टर डोस!

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा (NCP) भोसरीत राष्ट्रीय एकात्मा स्नेहमेळावा तथा जश्न ए ईद मिलादचा कार्यक्रम बुधवारी झाला.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama

पिंपरी : भोंगा आणि हनुमान चालिसेवरून सध्या राज्यच नाही, तर देशात राजकीय वातावरण तापलेले असून त्यावरून भाजप (BJP), मनसे (MNS) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. त्याचे पडसाद पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) लांडेवाडी, भोसरीत आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकात्मा स्नेहमेळावा तथा जश्न ए ईद मिलादच्या सोहळ्यात बुधवारी (ता.११) रात्री उमटले. (Sharad Pawar Latest News)

देशात सध्या काही जण जातीय आणि धार्मिक विद्वेष पसरवण्याचे काम करीत असले, तरी आम्हाला, मात्र विकास पाहिजे आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावेळी सांगितले. तसेच विकासासाठी एकतेची आणि एकतेकरिता अशा मेळाव्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

Sharad Pawar
भाजपच्या ट्विटर अकाऊंटवरील शरद पवारांसंदर्भातील पोस्टमुळे राष्ट्रवादी आक्रमक

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला बूस्टर डोस देणारा हा मेळावा ठरला. या निवडणुकीचे रणशिंगच जणू काही याव्दारे फुंकल्याची चर्चा ऐकायला मिळाली. कारण त्यासाठी पक्षाचे झाडून सारे नेते, पदाधिकारी एकवटले होते. शहरातील पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे हे प्रकृती बरी नसतानाही आवर्जून उपस्थित होते. शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मुख्य प्रवक्ते तथा समन्वयक योगेश बहल आदींसह सर्वधर्मीय धर्मगुरु व्यासपीठावर यावेळी उपस्थित होते. या धर्मगुरुंनी एकत्रित पवार यांचा सन्मान केला. तर, पक्षाच्या वतीनेही त्यांचा सत्कार करून त्यांना मानपत्र देण्यात आले. त्याचे वाचन युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप यांनी केले.

काही शक्ती सध्या देशात एक वेगळेच वातावरण निर्माण करीत असल्याचे सांगत पवार यांनी नाव न घेता भाजप, मनसेला यावेळ आपल्या भाषणात लक्ष्य केले. म्हणून एकवाक्यता निर्माण करण्यासाठी अशा मेळाव्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. मिनी इंडियाचे दर्शन या मेळाव्यातून घडले.

त्यातून पिंपरी-चिंचवड हे मिनी इंडिया असल्याचा प्रत्ययही आला, असे ते म्हणाले. प्रत्येक धर्म कुणाचा द्वेष करा असे सांगत नाही, तर बंधूभाव सांगतो, असे म्हणत देश प्रगत होण्यासाठी सामाजिक, धार्मिय, जातीय एकतेची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. त्यासाठी हा मेळावा आयोजित केल्याबद्दल त्यांनी पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.

Sharad Pawar
आमदार राऊतांना बारबोले देणार धक्का : पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत करणार प्रवेश!

जात, धर्म नसलेल्या भाकरीच्या आधारावर वसलेले शहर असा पिंपरी-चिंचवडचा उल्लेख कोल्हे यांनी यावेळी आपल्या भाषणात केला. धर्म आणि वंशवादावर कुठलीच सत्ता टिकत नसून जर्मनी, अफगणिस्तान आणि आता श्रीलंका ही त्याची ढळढळीत उदाहरणे आहेत, असे ते म्हणाले. भाजपने राज्यात पिलावळ सोडली असून तिचे काम फक्त भोंगा वाजवण्याचे आहे, अशी तोफ माजी आमदार लांडे यांनी मनसेचे नाव न घेता डागली.

शहरात विकासकामे राष्ट्रवादीने केली आणि यांनी (भाजप) फक्त पैसे खाण्याचे काम केले. नदीच्या अलिकडे आणि पलिकडे असे फक्त पाहिले, असा हल्लाबोल त्यांनी केला. तर, वेगळे वातावरण तयार करणाऱ्या फॅसिस्ट शक्तींना सत्तेतून दूर करण्याची गरज गव्हाणे यांनी प्रतिपादित केली. कारण या शक्ती धर्माच्या नशेची गोळी देऊन भरकटवत आहेत, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in