Rupali Thombare : भाजपकडून आचारसंहितेचं उल्लंघन; रुपाली ठोंबरेंनी केली गुन्हा दाखल करण्याची मागणी

NCP Attacks on BJP : हळदी कुंकवाच्या कार्यक्रामवरून भाजपच्या वरीष्ठ नेत्यांना घेरले
Rupali Thombare
Rupali ThombareSarkarnama

Kasaba by-election News : पुण्यात कसबा पेठ पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर या विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा प्रकार म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप होत आहे.

कसबा पेठ पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. असे असतानाही भाजपचे झेंडे, लोगो लावण्यात येत आहेत. भेट वस्तूसाठी पक्षाच्या चिन्हाचा पिशवी वापरली जात असल्याचे विरोधी पक्षाकडून सांगण्यात येतात.

भाजपच्या अशा कार्यक्रमांना वरीष्ठ नेतेही उपस्थित लावत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.त्यामुळे कार्यक्रमांचे आयोजक आणि त्यास उपस्थित राहत असलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांनी केली.

Rupali Thombare
Odisha Health Minister Naba Das : ओडिशाचे आयोग्यमंत्री नाबा दास यांचा उपचारादरम्यान मृत्यू

सध्या पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणूक जाहीर झाली याहे. त्यानंतर या विधानसभा मतदारसंघात आज भाजपचे हेमंत रासने यांनी महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भाजपकडून आलेल्या महिलांना भेटवस्तू दिल्या. त्या भेटवस्तू देण्यासाठी वापरलेल्या पिशवीवर पक्षाचे चिन्ह होते.

या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chiitra Wagh) होते उपस्थित असल्याचेही ठोंबरे यांनी सांगितले. त्यामुळे या सर्वांवर आचारसंहिताचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी केली.

Rupali Thombare
Marathwada Teacher Constituency : शिक्षक आमदारासाठी ६१ हजार गुरुजी करणार मतदान..

कसबा पेठ पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. तेथून भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasane) इच्छूक आहेत. भाजप मात्र सर्रासपणे याचे उल्लंघन केले जात असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. भाजप पक्षाचे झेंडे, लोगो लावले जातात. पक्षाच्या चिन्हं असलेल्या पिशवीतून कार्यक्रमाला आलेल्यांना भेटवस्तू दिल्या जात आहेत. भाजपचे 'महान' नेते येतात,असे म्हणत ठोंबरे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com