मुक्ता टिळकांच्या निधनानंतर पाचव्याच दिवशी राष्ट्रवादीच्या रूपाली पाटलांना आमदारकीचे वेध

Rupali Patil Thombare News : रुपाली पाटील यांच्या घोषणेमुळे राष्ट्रवादीत नाराजी...
Rupali Patil Thombare News
Rupali Patil Thombare NewsRupali Patil Thombare News

Rupali Patil Thombare News : भाजपच्या कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतेच निधन झाले आहे. मात्र, टिळक यांच्या निधनाला ४ दिवसच झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, रुपाली पाटील यांनी केलेल्या घोषणेमुळे राष्ट्रवादीतच नाराजीचे सूर उमटत आहे.

Rupali Patil Thombare News
Baramati Agro Sugar Factory : राज्य सरकारकडून बारामती अॅग्रो चौकशीप्रकरणी मोठी कारवाई; लेखापरीक्षक निलंबित

राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना कसबा मतदारसंघाच्या आमदारकी लढविण्याविषयी आपली भूमिका मांडली होती. यावेळी पाटील म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदेश दिला तर मी कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. मुक्ता टिळक यांच्यानंतर त्यांच्या घरात राजकारणात येण्यासाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी कोणी नाही. त्यांचे पती राजकारणात सक्रिय नाही. मुलगा सुद्धा लहान असून त्याचे नुकतेच लग्न झाले आहे.

मनसेने २०१९ मध्ये मुक्ता टिळक आजारी आहेत म्हणून माझं तिकीट कापलं होतं. त्यावेळी आम्ही समजूतदारपणा दाखवला होता. पण त्यानंतर कुठलीही विकासाची कामे झालेली नाहीत. तसेच पोटनिवडणुकीत जनतेचा कौल मी स्वीकारेल असेही मत रुपाली पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहेत.

Rupali Patil Thombare News
Rupali Patil-Thombare : रुपाली चाकणकर रुपाली पाटलांना अडकवणार?

रुपाली पाटील यांच्या घोषणेमुळे राष्ट्रवादीत नाराजी...

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाने संधी दिल्यास लढणार अशी घोषणा रूपाली पाटलांनी करताच राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. वरिष्ठांना न विचारताच पाटील यांनी भूमिका मांडल्यामुळे शहरातील पदाधिकारी नाराज झाले आहेत. याबाबत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे. पाटील यांच्या घोषणेमुळे जनमानसात चुकीचा संदेश जात असल्याचे राष्ट्रवादी पदाधिकारी यांचे मत आहे. मुळात राज्यात महाविकास आघाडी आहे. आणि कसबा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे असूनही रूपाली पाटलांनी दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com