संजय काळेंच्या बिनविरोधसाठी आमदार बेनके लागले कामाला; आशा बुचकेंच्या भूमिकेकडे लक्ष

जुन्नरमध्ये जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला भाजप आव्हान देणार का?
संजय काळेंच्या बिनविरोधसाठी आमदार बेनके लागले कामाला; आशा बुचकेंच्या भूमिकेकडे लक्ष
Asha Buchake-Sanjay Kale-Atul BenkeSarkarnama

जुन्नर (जि. पुणे) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत जुन्नर तालुक्यात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारास भारतीय जनता पक्ष (BJP) आव्हान देणार की निवडणूक बिनविरोध होणार? याकडे राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांच्या भाजप प्रवेशानंतर तालुक्यातील पक्षाची ताकद वाढली आहे. तालुक्यातील विविध गावांत तसेच संस्थांमध्ये बुचके यांना मानणारा वर्ग आहे. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांना त्या आव्हान देऊ शकतील, अशी चर्चा तालुक्यात आहे. (NCP's MLA Atul Benke started working for unopposed election of Sanjay Kale)

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जिल्हा बँकेचे संचालक संजय काळे यांनी सोसायटी मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आमदार अतुल बेनके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, पंकज महाराज गावडे आदी मान्यवर तसेच सोसायटी मतदारसंघातील ७७ पैकी ७५ मतदारांच्या उपस्थितीत त्यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिकता शिल्लक असल्याची चर्चा आहे. या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद संजय काळे यांना देण्याची मागणी अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे सत्यशील शेरकर यांनी सांगितले. आमदार अतुल बेनके यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू केले असून महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या तालुका प्रमुखांसमवेत चर्चा केली आहे.

Asha Buchake-Sanjay Kale-Atul Benke
दोन मंत्री, तीन आमदार जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीच्या रिंगणात!

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, विघ्नहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप, जुन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पापा खोत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते भाऊ देवाडे, नगरसेवक भाऊ कुंभार, सुनील ढोबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश ताजणे, धोंडीभाऊ पिंगट, विनायक तांबे, बाजीराव ढोले, बाळासाहेब खिलारी तसेच तालुक्यातील माजी आजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान, या निवडणुकीत मतदारांवर विशेष लक्ष राहणार आहे. निवडणूक लागल्यास उमेदवारांना मतदारांची बाडदास्त ठेवावी लागणार आहे.

Asha Buchake-Sanjay Kale-Atul Benke
जिल्हा बॅंकेसाठी अजितदादांचा अर्ज; दुसऱ्या नावाची उत्सुकता!

ॲड. काळे यांच्या विरोधात सोसायटी गटातून कोणी अर्ज दाखल करणार नसल्याची चर्चा असून असे झाले तर काळे यांच्या बिनविरोध निवडीची दाट शक्यता आहे. भारतीय जनता पक्ष जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, याकडे कार्यकर्त्याचे लक्ष लागले आहे. पक्षाच्या वतीने उमेदवार उभा करणार का ? या बाबत वेगवेगळी चर्चा होत आहे. भाजप नेत्या आशा बुचके यांनी उमेदवारी अर्ज घेतला असल्याचे समजते. मात्र, त्या महिला राखीव गटात निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

Asha Buchake-Sanjay Kale-Atul Benke
पंचाहत्तरीतील निवृत्तिअण्णा गवारेंच्या विरोधात यंदा आमदार पवारांनी ठोकला शड्डू!

ॲड. संजय काळे यांचा उमेदवारी अर्ज भरताना तालुक्यातील 77 पैकी 75 मतदार उपस्थित होते, त्यामुळेच काळे यांची निवड बिनविरोध व्हावी, अशी इच्छा आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद संजय काळे यांना द्यावे, अशी मागणी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले. पंकज महाराज गावडे यांनी महाविकास आघाडी असल्याने जुन्नर शिवसेनेच्या वतीने काळे यांना पाठींबा जाहीर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.