Maval Loksabha News: राष्ट्रवादीचा मावळ लोकसभेवर दावा; ठाकरे गट तो मान्य करणार का ?

Pune News: आघाडीत मावळ लोकसभा राष्ट्रवादीकडे घेण्याची पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आग्रह, ठाकरे शिवसेना क्लेम सोडेल?
Maval Loksabha News
Maval Loksabha NewsSarkarnama

पिंपरी : २०२४ च्या लोकसभेच्या तयारीला राष्ट्रवादी काँग्रेस आतापासूनच लागली आहे. त्यातून त्यांनी महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा मुंबईतील प्रदेश कार्यालयात गेल्या दोन दिवसांत घेतला. त्यात मावळ लोकसभेची जागा २०२४ ला आघाडीत राष्ट्रवादीकडे घेण्याची मागणी पिंपरी-चिंचवडसह मावळातील पदाधिकाऱ्यांनी केली.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणूनच दोन्ही काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना लढणार असल्याला राष्ट्रवादीच्या मुंबईतील या मतदारसंघनिहाय आढावा बैठकीने दुजोरा मिळाला आहे. त्यामुळे त्यादृष्टीने राष्ट्रवादीने व्यूहरचना सुरु केली आहे. काल व आजची मुंबईतील बैठक हा त्याचाच एक भाग होता.

Maval Loksabha News
Shirur LokSabha News: राष्ट्रवादीला शिरूर लोकसभेसाठी सापडला पर्याय; अमोल कोल्हेंचं काय होणार ?

त्यातून राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला गेला. तेथील ताकद जोखण्याचा प्रयत्न केला गेला. पण उमेदवार कोण यावर अजिबात चर्चा झाली नाही, असे या बैठकीला उपस्थित असलेले पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, महिला शहराध्यक्षा प्रा.कविता आल्हाट, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी सायंकाळी 'सरकारनामा'ला सांगितले.

तसेच उमेदवार यावेळी लवकर जाहीर करण्याची मागणीही त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे यावेळी केली. गतवेळी २०१९ ला मावळातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. मात्र, सध्या ते शिंदेंच्या शिवसेनेत आहेत.

हा पक्ष भाजपबरोबर राज्यात सत्तेत असून राष्ट्रवादीचा प्रतिस्पर्धी आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ही महाविकास आघाडीत राष्ट्रवादीबरोबर आहे. मात्र, त्यांची ताकद मावळात तेवढी नाही. त्यापेक्षा राष्ट्रवादीकडे तेथे दोन आमदार (पिंपरीत अण्णा बनसोडे आणि मावळात सुनील शेळके) आहेत.

Maval Loksabha News
Ahmednagar News: नामांतराला फारसं उत्सुक नसलेल्या विखे-पाटलांवर नामांतराची घोषणा झाल्यावर आभार मानण्याची वेळ

तर २६ फेब्रुवारीला झालेल्या चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराने (नाना काटे) यांनी लाखभर मते घेतली आहेत. याकडेही लक्ष पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे आगामी लोकसभेला मावळ राष्ट्रवादीकडे घेण्याची मागणी या बैठकीला उपस्थित असलेल्या उद्योगनगरीतील वरील सर्वच पदाधिकारी तसेच मावळचे पक्षाचे आमदार शेळके यांनीही केली. हे म्हणणे पक्षप्रमुख तथा अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते प्रफूल्ल पटेल, छगन भुजबळ, अजित पवार, सुप्रिया सुळे आदींनी ऐकून घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com