राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी प्रसिद्धीसाठीचे पोरखेळ बंद करावेत

महापालिकेतील सत्ता काबीज करण्याची भाषा करणाऱ्या जगताप यांनी आधी शंभर उमेदवार तरी शोधून दाखवावेत,
jagtap-mulik.jpg
jagtap-mulik.jpg

पुणे : एकच गोष्ट वारंवार सांगितली की खरी वाटायला लागते, याच भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप धादांत खोटं बोलत असतात. पण पुणेकर सुज्ञ आहेत. राष्ट्रवादीच्या नाकर्तेपणाला ते चांगलेच ओळखून आहेत, असा टोला भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांनीलगावला.महापालिकेतील सत्ता काबीज करण्याची भाषा करणाऱ्या जगताप यांनी आधी शंभर उमेदवार तरी शोधून दाखवावेत, असेही मुळीक यांनी म्हटले आहे.(NCP's city president should stop playing games for publicity) 

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी काय काम केले हे विचारणाऱ्यांनी कधीतरी कोथरूड मतदारसंघात यावे आणि पाटील यांनी केलेल्या अफाट सेवाकार्याचा अभ्यास करावा, असे मुळीक यांनी म्हटले आहे.ज्या मतदारसंघात ज्य पक्षाचे अस्तित्वदेखील नाही त्यांना काय काम केलं हे कसं समजणार, असा प्रश्‍नही मुळीक यांनी उपस्थित केला आहे. 

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष फक्त माध्यमांमधील बातम्यात सापडतात. कामाच्या नावाने शून्य अशी जळजळीत टीका त्यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जगताप यांच्यावर केली आहे. जगताप हे शहराध्यक्ष झाल्यापासून महापालिका ताब्यात घेण्याचे स्वप्न त्यांना पडत आहे. मात्र, हे स्वप्न पाहण्याचे बंद करून आधी किमान शंभर उमेदवार तरी शोधावेत असे आव्हान मुळीक यांनी दिले आहे. 

जगतपा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी कामाचा झपाटा लावला आहे. कॉंग्रेस वगळता सर्व राजकीय पक्षात चांगले आणि भव्य कार्यालय त्यांनी अल्पावधीत उभे करून दाखवले. पक्षाची संघटनात्मक बांधणी जोमाने सुरू केली. याचबरोबर राजकीय आरोप-प्रत्योरोपात ते नेहमी आघाडीवर असतात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वांवरच ते टीका करीत आहेत. या पाश्‍र्वभूमीवर  मुळीक यांनी जगताप यांच्यावर टीका केली आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com