
NCP News : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी दिवाळी फराळ साहित्य (एकेक किलो रवा, साखर, डाळ आणि तेल) शंभर रुपयांत देण्याचा निर्णय राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत घेतला. त्याला आनंदी शिधा असे नाव देण्यात आले आहे.
मात्र, दिवाळी सुरु होऊन दोन दिवस उलटल्यानंतरही तो शहरवासियांना न मिळाल्याने पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) ही योजना व ती राबविणाऱ्या राज्य सरकारचा आज (ता.२३) आंदोलन करीत निषेध केला. 'गोरगरिबांचा आनंदी शिधा फक्त चित्रात दिवाळीचा फराळ मात्र, राज्य सरकारच्या पात्रात' या बॅनरखाली शहराच्या मध्यवर्ती भागातील चापेकर चौकात हे आंदोलन झाले.
जनसामान्यांना हा शिधा मिळणार कधी आणि त्याचा फराळ होणार कधी अशी विचारणा यावेळी करण्यात आली. तसेच याप्रसंगी या उपक्रमाचा फोलपणा सिद्ध करणारी एक नाटिकाही सादर करण्यात आली. पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavane), महीला शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट, कार्याध्यक्ष कविता खराडे, विभागीय अध्यक्ष वैशाली नागवडे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, माजी नगरसेवक माया बारणे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
आनंदी शिधा कीटचा फक्त गाजावाजा केला, पण तो गरिबांपर्यंत पोचलाच नाही. म्हणून या अयशस्वी सरकारचा निषेध करतो, असे गव्हाणे म्हणाले. राज्य सरकारने जनतेला फक्त खोटी आश्वासने दिली. चित्रातच दिवाळी साजरी करायला सांगितली. गोरगरिबांची दिवाळी चित्रात आणि दिवाळी फराळ सरकारच्या पात्रात, असा हल्लाबोल प्रा. आल्हाट यांनी केला. तर, ऐन दिवाळीत गरिबांच्या घरात अंधार पडला असला, तरी या सरकारला काही फरक पडेना. ते आपल्याच तंद्रीत आहे. जनतेचे त्यांना काही देणे घेणे नाही, अशी टीका नागवडे यांनी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.