चंद्रकांत पाटलांनी सभा घेतलेल्या गावांत भाजप समर्थक पॅनेलचा धुव्वा : राष्ट्रवादीची बाजी

गावपातळीवरच्या निवडणुकीत पालकमंत्र्यांनी उडी घेतल्याची बाब तालुका राष्ट्रवादीसह ग्रामस्थांना सुद्धा रुचली नव्हती. त्याचेच पडसाद आजच्या मतमोजणीतून दिसून आले.
Sakurdi, Koregaon Khurd Gram Panchayat Result
Sakurdi, Koregaon Khurd Gram Panchayat ResultSarkarnama

महेंद्र शिंदे /रूपेश बुट्टे पाटील

कडूस (जि. पुणे) : पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सभा घेतलेल्या खेड (Khed) तालुक्यातील साकुर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या (NCP) जानकीमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने भाजप (bjp) समर्थक पॅनेलचा सुफडा साफ करीत सरपंचपदासह नऊ पैकी सात जागांवर विजय मिळवला. विरोधकांच्या समर्थनासाठी पालकमंत्री गावात येऊनही दणदणीत विजय मिळविल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. (NCP wins Sakurdi, Koregaon Khurd Gram Panchayat)

ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचलेला असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साकुर्डी येथे भाजपाला मानणाऱ्या जानुबाई ग्रामविकास पॅनेलच्या समर्थनार्थ सभा घेऊन मतदारांना 'योग्य व चांगल्या उमेदवारांना निवडून द्या,' असे आवाहन केले होते. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बहुल व दुर्गम भागातील गावात ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत पालकमंत्र्यांनी सभा घेतल्याने एरव्ही पंचक्रोशीबाहेर चर्चेत नसलेली साकुर्डी ग्रामपंचायतीची निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणात औत्सुक्याचा व चर्चेचा विषय ठरली होती.

Sakurdi, Koregaon Khurd Gram Panchayat Result
वेल्ह्यात काँग्रेसची सरशी : तालुकाध्यक्षाच्या गावातच राष्ट्रवादीचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत

ग्रामपंचायत सारख्या गावपातळीवरच्या छोट्या निवडणुक रणधुमाळीत राज्याच्या मंत्र्यांनी उडी घेतल्याची बाब तालुका राष्ट्रवादीसह ग्रामस्थांना सुद्धा रुचली नव्हती. त्याचेच पडसाद आजच्या ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीतून दिसून आले. पालकमंत्र्यांनी समर्थनार्थ सभा घेऊनही भाजपाला मानणाऱ्या जानुबाई ग्रामविकास पॅनेलचा धुव्वा उडाला. राष्ट्रवादीच्या जानकीमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने सरपंचपदासह नऊ पैकी सात जागांवर विजय मिळवला, तर विरोधी पॅनेलला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले.

Sakurdi, Koregaon Khurd Gram Panchayat Result
बारामतीत धक्कादायक निकाल : राष्ट्रवादीच्या तालुका उपाध्यक्षाचा तरुणाकडून दारुण पराभव

मावळत्या सरपंच ज्योती सुपे या पुन्हा सरपंचपदासाठी निवडणूक रिंगणात होत्या, परंतु यात राष्ट्रवादीच्या रोहिणी शंकर गवारी यांनी एकतर्फी बाजी मारली. सुपे यांना ४१९ तर गवारी यांना ६३८ मते मिळाली. त्यांच्यात २१९ मतांचा फरक राहिला.

Sakurdi, Koregaon Khurd Gram Panchayat Result
सांगोल्यात शेकापला धक्का; शिवण्यातील सत्ता गमावली : पाटील-साळुंखे गटाने जिंकल्या चार ग्रामपंचायती

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे - सरपंच - रोहिणी शंकर गवारी, सदस्य, वॉर्ड १ - उत्तम तुकाराम लाडके (१८०), अजय शंकर चौधरी (२१९), राधाबाई सखाराम लोहकरे (२१२). वॉर्ड २ - किरण जगन्नाथ भवारी (१९६), कोमल शंकर गवारी (१७६), नंदा दत्तात्रेय कदम (१८८), वॉर्ड ३ - तुकाराम यमना शेळके (२०९), अमृता भरत चोरघे (२२९), बिनविरोध - रोहिणी बाळू कोकणे. विजयानंतर राष्ट्रवादी समर्थकांनी भंडारा उधळून मोठा जल्लोष केला. आमदार पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मोहिते व माजी जिल्हा परिषद सदस्या मंगल चांभारे यांनी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा फेटा बांधून सन्मान केला.

Sakurdi, Koregaon Khurd Gram Panchayat Result
Gram Panchayat Result: आंबेगावात राष्ट्रवादी पुन्हा....२१ पैकी १७ ग्रामपंचायतींवर वळसे पाटलांचे वर्चस्व!

कोरेगावातही भाजपच्या पदरी अपयश

आंबेठाण : कोरेगाव खुर्द (ता.खेड) ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून सीमा राजू झांबरे यांची मोठ्या मताधिक्याने निवड करण्यात आली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार आरती सुरेश काळे यांच्यावर तब्बल २८८ मतांनी मात केली. पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या गावात येऊन उमेदवार विजयी करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांच्या समर्थक उमेदवाराचा पराभव झाल्याने भाजपवर मोठी नामुष्की आली आहे.

Sakurdi, Koregaon Khurd Gram Panchayat Result
Gram panchayat result updates: परिचारक गटाच्या शिवानंद पाटलांनी गाव राखले; मंगळवेढ्यात समविचारीचा बोलबाला

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह माजी मंत्री संजय भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी उमेदवार विजयी करण्याचे आवाहन केले होते. राज्याच्या मंत्र्याने ग्रामपंचायत पातळीवर येऊन प्रचार केल्याने येथील विरोधी गटाने नाराजी व्यक्त केली होती.सुरुवातीला चुरशीची वाटणारी ही निवडणूक प्रत्यक्षात मात्र एकतर्फी झाली.

Sakurdi, Koregaon Khurd Gram Panchayat Result
Gram panchayat election result : गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांना धक्का; मुलीचा विजय मात्र संपूर्ण पॅनेलचा धक्कादायक पराभव

येथील सरपंचपद सर्वसाधारण महिलांना राखीव होते. गावातील पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच होण्यासाठी काळे आरती सुरेश आणि झांबरे सीमा राजू यांच्यात सरळ सामना होता.यात काळे यांना ४३२ मते तर झांबरे यांना ७११ मते पडली.

वॉर्डनिहाय विजयी उमेदवार

* वॉर्ड क्रमांक एक ( तीन जागा )

थोरात रंजना चिंधु ( ३८९ मते,विजयी ).

विद्या सतीश कडूसकर (३५५ मते,विजयी )

मेंगळे होना रामा ( बिनविरोध )

* वॉर्ड क्रमांक दोन ( तीन जागा )

मेंगळे रामदास रघुनाथ (१७४ मते,)

गावडे सहिंद्रा राजाराम ( १९३ मते)

गाळव काळूराम नाना ( २३० मते)

* वॉर्ड क्रमांक तीन (तीन जागा)

कडूसकर जया साहेबराव ( २३२ मते, विजयी)

दोंदे प्रकाश दत्तात्रय ( १७० मते, विजयी)

गळे जिजा भिवा (बिनविरोध)

पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढविलेले आणि त्यात पराभूत झालेले रामदास मेंगळे यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत विजय मिळविला. भाजपने या निवडणुकीत पालकमंत्री यांना बोलावून खालचे राजकारण केले आहे. ही निवडणूक गावपातळीवर होऊ द्यायला पाहिजे होती. मंत्री गावात येऊन प्रचार करून गेले हे गावकऱ्यांना रुचले नाही. त्यांनी मतदानातून आपला रोष व्यक्त केला, असे माजी उपसरपंच राजू झांबरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com