
Nagaland News : केरळ, तामिळनाडूमध्ये भाजप येण्याची शक्यता नाही. तसेच आंद्रप्रदेश, हैद्राबाद, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेशमध्ये भाजप नाही. आपल्याकडे शिक्षक-पदवीदर निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्था आणि आता पार पडलेल्या पुणे व पिंपरी-चिंचवडच्या पोटनिवडणुकीचे निकाल पहाता बदलाचे वारे वेगाने वाहू लागले आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.
बारामती-गोविंदबाग येथील आपल्या निवासस्थानी शरद पवार पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रात पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळत असलेले यश, राष्ट्रवादी पक्षाच्या नागालॅंडमध्ये निवडून आलेल्या ८ जागा, निवडणूक आयोगाबाबात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, कांद्याचे पडलेले भाव आदी विविध मुद्यांच्या आधारे पवार यांनी यावेळी भाजप (BJP) सरकारकाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
नागालॅंडमध्ये राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले याबाबत पवार म्हणाले, नागालॅंड येथे १२ जागा लढविल्या आणि तेथील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ८ उमेदवारांना विजयी करीत काम करण्याची संधी दिली. विशेष म्हणजे नागालॅंडला राष्ट्रवादी पक्ष दोन नंबरचा पक्ष झालेला आहे. जो सत्ताधारी पक्ष आहे त्याचे सरकार बनेल. मात्र, मान्यता प्राप्त विरोधी पक्ष याचे नेतृत्व हे राष्ट्रवादीच्या व्यक्तीकडे येईल, असे पवार यांनी सांगितले.
आमच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी नरेंद्र वर्मा त्यांना नागालॅंडला पाठविले आहे. पुढील दोन दिवसात ते तेथील सर्वांशी चर्चा करतील. तेथे काय आणि कसे करायचे, याची माहिती मला देतील आणि त्यानंतर मी निर्णय घेणार आहे. मी तेथील जनतेला धन्यवाद देतो त्यांनी मतदानाची चांगली टक्केवारी आमच्याबाजूने उभी केली, असेही पवार म्हणाले.
या वेळी पवार म्हणाले, आंद्रप्रदेश आणि हौद्राबाद या दोन्ही ठिकाणी बघितले तर भाजप त्या ठिकाणी नाही. तशीच स्थिती पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेशात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमघ्ये बदल अपेक्षित आहे. ''निवडणूक आयोगाबाबतच्या शंका आमच्या काही सहकारऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगाबाबत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने बदल केला. नियुक्ती करताना सरन्यायाधीश, प्रधानमंत्री आणि मुख्य म्हणजे विरोधी पक्ष नेताही त्या प्रक्रियेत आले आहेत. त्यामुळे हा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अतिषय चांगला झाला आहे, असे सांगत पवार यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.