प्रभाग रचनेचा तिढा : राज्य सरकारविरोधात राष्ट्रवादी दाखल करणार अवमान याचिका

Prashanat Jagtap : न्यायालयाने आदेश दिले असताना, त्याला न जुमानता असे निर्णय घेणे अवमान आहे, असे जगताप म्हणाले.
Prashant Jagtap
Prashant JagtapSarkarnama

पुणे : नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात, पुणे महापालिका निवडणुकीसाठी (PMC election 2022) पूर्वीप्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या याच निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार विरोध केला आहे. पुण्यात या मुद्द्यावर राष्ट्रवादी आक्रमक होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) अवमान याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. मुंबई महापालिका वगळता बाकी सर्व महापालिकांच्या निवडणुका चार सदस्य प्रभाग पद्धतीनेच घेतल्या जातील, असा निर्णय राज्य सरकारने नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात घेतला होता. (Latest Marathi News)

Prashant Jagtap
काय ते मंत्री? काय त्यांचे नाव? काय त्यांचा दौरा? एकदम OK; सावंतांना मिटकरींनी डिवचले

यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने घेतलेला तीन सदस्यीय प्रभागाचा निर्णय बदलण्यात आला आहे. यानंतर राष्ट्रवादीने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने मंत्रिमंडळाच्या चार सदस्य प्रभाग रचनेच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. या नंतरही राज्य सरकारने पुन्हा चार सदस्य प्रभाग रचनेचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला असल्याची टीका, पुणे राष्ट्रवादीने केली आहे. याविरोधात आता अवमान याचिका दाखल करण्यात येणार आहे.

Prashant Jagtap
कर्जत-जामखेडमधील रस्त्याच्या कामात अपहाराचा आरोप : चार सदस्यीय समिती चौकशी करणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या नियोजनाबाबत आधीच गोंधळाचे वातावरण आहे. प्रभाग रचना निर्णयाविषयी राज्य सरकारला न्यायालयाने आदेश दिले. तसेच निवडणुका न घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहे. अशी स्थिती असतानाही, उघडपणे राज्य सरकारकडून नियमांचा भंग केला जात आहे. याविरोधात राष्ट्रवादी न्यायालयात जाणार आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडणे, प्रभागपद्धतीत बदल असे निर्णय सरकारने घेतले. मात्र न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिले असताना, त्याला न जुमानता असे निर्णय घेणे न्यायालयाचा अवमान आहे, असे जगताप म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com