NCP : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कोश्यारींना दिली शिवाजी महाराजांची तीन पुस्तके..

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल जोपर्यंत माफी मागणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे," असे जगताप यांनी सांगितले
Bhagat Singh Koshyari pune
Bhagat Singh Koshyari pune sarkarnama

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर विविध संघटना आक्रमक झाल्याचे चित्र राज्यभरात दिसून येत आहे. आज पुण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसने आंदोलन केले.

राज्यपालांच्या ताफ्याच्या दिशेने जाण्याऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अटकाव केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी कोश्यारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज याच्यावरील तीन पुस्तके भेट दिली.

"राज्यपालांनी दिलगिरी व्यक्त करत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असे मत व्यक्त केलं आहे. जर त्यांनी महाराष्ट्राची माफी नाही मागितली तर महाराष्ट्र गप्प बसणार नाही. राज्यपाल जोपर्यंत माफी मागणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे," असे जगताप यांनी सांगितले

Bhagat Singh Koshyari pune
Bhagat Singh Koshyari : राजभवनासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा ;"कोश्यारींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही.."

काँग्रेस कार्यकर्त्यांनीही काळे झेंडे दाखवले. कोश्यारी आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात आले होते. राजभवनासमोर राज्यपालांच्या विरोधात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. "कोश्यारीला महाराष्ट्रात फिरू देणार नाही," असा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला. शहराध्यक्ष राहुल शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. 'राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' घोषणा देत राज्यपालांचा निषेध करण्यात आला. यावेळी पोलिसांनी घोषणा देणाऱ्यांना रस्त्यातच अडवून त्यांच्या ताब्यातील काळे झेंडे घेण्याचा प्रयत्न केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com