राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंची बदनामी करणारा मनसेचा कार्यकर्ता ताब्यात

मनसेच्या समीर लाड याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
MNS Leader Roopali Patil
MNS Leader Roopali Patil sarkarnama

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil ) यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी काही दिवसापूर्वी १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका मनसे कार्यकर्त्यांला आज ताब्यात घेण्यात आले आहे. समीर लाड असे त्याचे नाव आहे. त्याला मुंबईतून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लाड हा मनसेचा (MNS) कार्यकर्ता असल्याचं समोर आले आहे. अॅड. पुनम गुंजाळ यांनी याबाबत फरासखाना पोलिसांकडे तक्रार केली होती. काही दिवसापूर्वी रुपाली पाटील- ठोंबरे यांच्याविरोधात फेसबुकवर अश्लील भाषेत पोस्ट शेअर करण्यात आली होती.

MNS Leader Roopali Patil
दुर्बिणीने दानवे काय काय बघतात ते पहावं लागेल ; राऊतांचे सडेतोड उत्तर

याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. रुपाली पाटील यांना सोशल मीडियावरुन ट्रोल करणाऱ्या मनसेच्या समीर लाड याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

याप्रकरणी एप्रिल महिन्यात सागर चव्हाण, गजानन पाटील, प्रसाद राणे, धृवराज ढकेडकर, राजेश दंडनाईक, कुमार जाधव, सचिन कोमकर, सावळ्या कुंभार, निजामुद्दीन शेख, सुधीर लाड यांच्यासह आणखी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

फेसबुकवर 'एक करोड ताईवर नाराज असणाऱ्यांच्या ग्रुप' तयार करण्यात आला. यावर रुपाली ठोंबरे यांचा विनापरवानगी फोटो वापरण्यात आला होता. या ग्रुप वरच अश्लील भाषा वापरत त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.

फिर्यादी यांनी महिले विषयी अश्लील भाषेत बोलू नका, अशी विनंती केल्यानंतरही आरोपी लाड याने पर्सनल फेसबुक अकाउंटवरून रूपाली ठोंबरे यांना शिवीगाळ करत असल्याचा लाईव्ह व्हिडिओ टाकून बदनामी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com