रुग्णालयातील मोफत उपचार बंद केल्यास... ; अजित गव्हाणेंचा महापालिकेला इशारा

NCP| Ajit Gavhane news| महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यात उपचारासाठी आता राज्य शासनाच्या दराप्रमाणे आकारणी करण्यात येणार आहे.
Ajit Gavhane news|
Ajit Gavhane news|

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यातील वैद्यकीय सेवा सुविधा आणि औषधोपचाराकरीता राज्य शासनाच्या दराप्रमाणे आकारणी करण्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेने (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) आता ठरवले आहे. या धोरणाला पालिका आय़ुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे. पुढील आठवड्यापासून ते अंमलात येणार आहे.पण त्यामुळे रुग्णांना आतापेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार असल्याने या धोरणाला राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) कडाडून विरोध केला आहे. हे धोरण मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा या पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांनी शनिवारी (९ जुलै) दिला आहे.

Ajit Gavhane news|
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुण्यात शिवसेनेला खिंडार ; साळी, भोसले देणार राजीनामा

पालिकेची ८ रुग्णालये आणि २९ दवाखान्यांमध्ये आतापर्यंत मिळत असलेल्या मोफत उपचाराची व औषधांची सुविधा बंद करण्याच्या पालिका आयुक्त तथा प्रशासकांच्या निर्णयाचा मोठा फटका शहरातील गोरगरीबांना बसणार असल्याने त्याला विरोध असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले. केशरी शिधापत्रिकाधारकांनाही आता यासाठी शुल्क द्यावे लागणार असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.मोफत उपचार बंद करण्याबाबत आयुक्तांनी पुनर्विचार करावा व जनहितासाठी पुर्वीप्रमाणेच मोफत उपचार सुरू ठेवावेत आणि हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा त्याविरोधात रस्त्यावर उतरून जनआंदोलन केले जाईल,असा इशारा त्यांनी दिला आहे.शहर कॉग्रेसनेही आजच हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. अन्यथा जनआंदोलन उभारू,असा इशारा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनीही आयुक्तांना दिला आहे.

सर्वसामान्यांना मोफत आरोग्य सुविधा पुरविणे हे पालिकेचे कर्तव्यच आहे.आजपर्यंत पालिका रुग्णालयातील या उपचार व शस्त्रक्रियांमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.मोफत उपचारामुळे गोरगरिब रुग्णांना दिलासा मिळतो आहे,असे गव्हाणे यांनी काढलेल्या निषेध पत्रकात म्हटले आहे. गेल्या पाच वर्षांत पालिकेत सत्ताधारी भाजपने वैद्यकीयसारख्या क्षेत्रात देखील मोठा भ्रष्टाचार केला. मेडिकल साहित्य खरेदीसुद्धा त्यांच्या तावडीतून सुटली नाही. पालिकेच्या वैद्यकीय विभागात त्यांनी निर्माण केलेला हा भ्रष्टाचार थांबविल्यास कोणत्याही शुल्कवाढीची गरज भासणार नाही,असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in