भाजप नेत्यांच्या बेनामी संपत्तीचे पुरावे देणार ; मलिकांचा गैाप्यस्फोट

नवाब मलिक म्हणाले, ''भाजपच्या नेत्यांची (BJP leaders) हजारो कोटी रुपयांची बेनामी संपत्ती आहे. त्यांनी मंदीरांच्या जागा हडपल्या आहेत. विधानसभेमध्ये मी याबाबतचे पुरावे सादर करणार आहेत,''
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama

पुणे : ''भाजप हा फुगा असून आता त्यातील हवा हळूहळू कमी होऊ लागली आहे. फुगातील हवेप्रमाणेच भाजपचही आहे. त्यांच्याकडे ठोस असं काही नाही. पण ते आम्ही स्वच्छ आहोत. असं ते दाखवत आहेत,'' असा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. 'सकाळ'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मलिक बोलत होते.

'बिनधास्त बोला विथ नवाब मलिक' या विशेष मुलाखतीत मलिकांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. नवाब मलिक म्हणाले, ''भाजपच्या नेत्यांची (BJP leaders) हजारो कोटी रुपयांची बेनामी संपत्ती आहे. त्यांनी मंदीरांच्या जागा हडपल्या आहेत. विधानसभेमध्ये मी याबाबतचे पुरावे सादर करणार आहेत,''

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार येत्या मार्च महिन्यात पडणार असून मार्च महिन्यातच महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार येईल, अशी भविष्यवाणी केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी नुकतीत केली आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मलिक म्हणाले, ''सत्तेसाठी किंवा भीतीपोटी भाजपमध्ये गेली होती ते कधी भाजप सोडण्याचा तयारीत आहे. आघाडी सरकार पडणार असे सांगून भाजपचे नेते नारायण राणे यांनी आता मार्चची तारीख दिली. चार चार महिने ठरवून ते तारीख देत आहेत,

''आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे की हे महाविकास आघाडीचे सरकार आम्ही पाडणार नाही, असे ते म्हणतात कारण केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करुन सरकारला घाबरविण्याचा प्रयत्न भाजप करीत आहेत. पण आघाडीचा कुठलाही आमदार त्यांना घाबरत नाही. पैशाच्या जोरावर कर्नाटक व अन्य ठिकाणी त्यांनी आमदार फोडण्याचे प्रयत्न केलं पण तसे झाले नाही. फडणवीस आता स्वीकारलं ती की २०२४ मध्ये आमचं सरकार येईल, याचं कारण की त्यांचे कटकारस्थान त्यांचे चालणार नाही, हे फडणवीसांनी स्वीकारलं आहे,'' असा टोमणा मलिकांनी लगावला.

Nawab Malik
एकही डोस न घेतलेल्यांना 'जायकोव्ह-डी लस' मिळणार

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष व पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात उभारल्या जात असलेल्या संघटनेतून कॉंग्रेसला डावलले जात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्या वादावर नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पडदा टाकला आहे.

नवाब मलिक म्हणाले, ''शरद पवार हे सामुदायिक नेतृत्वावर विश्वास करतात. त्यामुळे काँग्रेस वगळून संपुआ होऊ शकत नाही. शरद पवार सर्वांना सोबत घेऊन चालतात आणि काँग्रेस सोडून संपुआ होईल, प्रश्न त्यांनी मोडीत काढला आहे. काँग्रेससह इतर विरोधकांना सोबत घेऊन मोट बांधण्याचे प्रयत्न मागील एक वर्षापासून पवार करीत आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com