Supriya Sule : ‘होय, मी बदला घेतला’... ; सुळेंनी फडणवीसांना सुनावलं

Supriya Sule : यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार माझ्यावर झाले, त्यानुसार विरोध हा वैचारिक असला पाहिजे.
Supriya Sule, Devendra Fadnavis
Supriya Sule, Devendra Fadnavissarkarnama

Supriya Sule : "होय मी बदलाच घेतला," अशा भावना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच व्यक्त केल्या आहेत. यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.(Supriya Sule latest news)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर फडणवीस यांनी जोरदार टीका करीत 'होय मी बदलाच घेतला,' अशा भावना व्यक्त केल्या आहेत. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. एखादी व्यक्ती थेट तुमच्या पाठीत खंजीर खुपसते तेव्हा राजकारणात जिवंत राहून त्याला ते परत करावं लागतं असंही ते म्हणाले.

फडणवीसाच्या या विधानावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्या माध्यमाशी बोलत होत्या. "राज्याच्या राजकारणात प्रथमच बदल्याची भाषा मी ऐकली व प्रसारमाध्यमात पाहिली अशा प्रकारे गोष्टी करणे दुर्दैवी आहे," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule, Devendra Fadnavis
Bharat Jodo Yatra : राहुल गांधींसाठी काय पण.., राजकीय लाभाचे पद नसतानाही शेतकऱ्याचे असेही प्रेम !

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "एखाद्या राजकीय कटुतेतून भारतीय जनता पक्षाचे एक मोठे नेते ‘होय, मी बदला घेतला’ म्हणणे धक्कादायक होते. ज्या संस्कृतीत मी वाढले, जे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार माझ्यावर झाले, त्यानुसार विरोध हा वैचारिक असला पाहिजे. त्यात बदल्याची भाषा कधी नसते,"

Supriya Sule, Devendra Fadnavis
ED प्रमुखांना मोदी सरकारकडून तिसऱ्यांदा मोठं गिफ्ट

"माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संर्दभात जी कारवाई करण्यात आली त्यातून राज्यातील राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ झाले आहे, हे दिसून आले. अशाप्रकारे हीन दर्जाचे राजकारण मला कधी अपेक्षित नव्हते. परंतु दुर्देवाने तसे आपल्याकडे घडते," अशी खंत सुळे यांनी व्यक्त केली.

काय म्हणाले होते फडणवीस..

"तुमच्यासोबत २४ तास राहणारी, सत्ता भोगणारी आणि निवडून आलेली व्यक्ती थेट तुमच्या पाठीत खंजीर खुपसते तेव्हा राजकारणात जिवंत राहून त्याला ते परत करावं लागतं. असं केल नाही तर तुम्हाला राजकारणात जगता येत नाही. राजकारणात चांगलंच रहायला हवं पण तुमच्या चांगुलपणाचा कुणी दुरुपयोग करत असेल, बेईमानी करत असेल तर त्याला जागा दाखवायला हवी आणि मी ती दाखवली. मला याचा अभिमान आहे. तुम्ही माझ्यासोबत बेईमानी केलीत तर त्याचा बदला मी घेईन आणि घेतला," असे फडणवीस म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com