फडणवीसांकडून शिंदेंना अपमानास्पद वागणूक ? सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्र्यांची काळजी

फडणवीसांनी काहीतरी एका चिठ्ठीवर लिहिलं आणि हळूच ही चिठ्ठी मुख्यमंत्र्यांच्यासमोर केली, त्यामुळे त्या चिठ्ठीत नेमकं होतं काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
Supriya Sule, Eknath Shinde
Supriya Sule, Eknath Shindesarkarnama

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी काल (गुरुवारी) पत्रकार परिषद घेत पेट्रोल 5 आणि डिजेल 3 रुपयांनी स्वस्त करण्याच्या घोषणेसह इतरही अनेक घोषणा केल्या. या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना एक चिठ्ठी सरकावली. त्यावरुन आता चर्चांना उधाण आलं आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाष्य केलं आहे. सुळे यांनी खोचक शब्दात एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली आहे. सुळे माध्यमांशी बोलत होत्या.(Supriya Sule latest news)

कालच्या (गुरुवार) पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत असताना शेजारी बसलेल्या फडणवीसांनी खिशाला लावलेला पेन काढला आणि काहीतरी एका चिठ्ठीवर लिहिलं आणि हळूच ही चिठ्ठी मुख्यमंत्र्यांच्यासमोर केली, त्यामुळे त्या चिठ्ठीत नेमकं होतं काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या योजनेबद्दल बोलत होते. त्यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींची नावे घेत त्यांचे आभार मानले, यावेळी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्री विसरले. या चिठ्ठीवर महाडिक यांचे नाव होते, असे समजते.

Supriya Sule, Eknath Shinde
शिंदे गटातील आमदाराचे कार्यालय फोडणाऱ्या २३ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "एकनाथ शिंदे यांना prompting करणे, चिठ्ठी देणे या प्रकारामुळे त्यांना कमी दाखवण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मला फार काळजी वाटते आहे. नवीन सरकार गोंधळलेले आहे. मुख्यमंत्र्यांचा अपमान होत आहे. त्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. सध्या राजकारणात जे चाललं आहे ते महाराष्ट्राला न शोभणारं आहे,"

Supriya Sule, Eknath Shinde
ठाकरेंच्या तीन निर्णयांना शिंदे सरकारकडून स्थगिती ; नामांतराबाबत नव्यानं निर्णय घेणार

संसद भवन परिसरात पक्षाना धार्मिक मुद्यांवर आंदोलन न करण्याच्या सूचना संसद सचिवालयाने दिल्या आहेत. "संविधानाने आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना दिला आहे. संसदेचे सचिवालय जर आंदोलन करु देणार नसतील, तर त्यांचा मी जाहीर निषेध करते. देश या संविधानावर चालतो. संसद परिसरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर यापूर्वी शांततेने आंदोलनं झाले आहेत. ते बंद करणे म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. ही हुकूमशाहीकडे वाटचाल आहे. हा भाजपचा "चूनावी जुमला" आहे. दडपशाहीचे हे सरकार आहे," असे सुळे म्हणाल्या.

पुणे महानगरपालिका समाज विकास विभागातर्फे महिला बचत गटातील महिलांसाठी विविध अभ्यास शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सुळे उपस्थित होत्या. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर याही उपस्थित होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in