स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला रक्तदान केल्यास आजीवन मोफत रक्त : अमोल कोल्हेंचा उपक्रम

Amol Kolhe | हजारो बाटल्या रक्त संकलन करण्याचे ध्येय
 Amol Kolhe
Amol Kolhesarkarnama

पिंपरी : स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सवानिमित्त केंद्र सरकारने देशभरात `हर घर तिरंगा` मोहीम राबविण्याचा संकल्प केला आहे. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवडमध्ये तीन लाख, तर देशात तीस कोटी घरांवर तिरंगा फडकावण्याचे उद्दिष्ट आहे. तर, यानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी संपूर्ण शिरूर मतदारसंघात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला प्रथमच जंबो रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्यातून हजारो बाटल्या रक्त संकलन करण्याचे ध्येय आहे. (Amol Kolhe | Shirur Latest News)

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना अभिवादन म्हणून हे रक्तदान शिबिर भरविण्यात आल्याचे खासदार कोल्हे यांनी `सरकारनामा`ला सांगितले. या शिबिरात रक्तदान करणाऱ्याला ६ लाख रुपयांचे सुरक्षा कवच (तीन लाखांचा अपघाती खर्च वैद्यकीय विमा आणि जीवीत हानी झाल्यास कुटुंबाला तीन लाख रुपये) दिले जाणार आहेच, शिवाय या रक्तदात्याला आजीवन मोफत रक्त पुरवठा केला जाणार आहे. तसेच त्याच्या नातेवाईकांनाही वर्षभर मोफत रक्त दिले जाणार आहे.

 Amol Kolhe
काँग्रेस आमदाराच्या जावयाने ६ जणांना चिरडलं : भीषण अपघातात सर्वांचा मृत्यू

स्वातंत्र्यासाठी ज्ञात अज्ञात हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या प्रयत्नातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन म्हणून खासदार कोल्हेंच्या संकल्पनेतून त्यांच्या जगदंब प्रतिष्ठान व राष्ट्रवादीच्या संयुक्त विद्यमाने शिरूर लोकसभेच्या सर्व सहा विधानसभेत हे रक्तदान शिबिर होणार आहे. (Amol Kolhe | Shirur Latest News)

 Amol Kolhe
राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार? पुढील सुनावणी २२ ऑगस्टला

पिंपरी-चिंचवडला इथे होणार मतदान...

भोसरी विधानसभा मतदारसंघात रूपीनगर, तळवडे येथील दक्षता गणपती मंदिर, चिखली येथील विकास साने कार्यालय, मोशी येथील जय गणेश लॉन्स, नेहरूनगर येथील अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक हॉल, दिघीतील दत्तनगर, इंद्रायणीनगर येथील संजय वाबळे यांचे संपर्क कार्यालय, सेक्टर क्रमांक २२, आंबेडकर वसाहत येथील श्रीराम भक्त हनुमान व्यायाम शाळा, यमुनानगर येथील प्रबोधनकार ठाकरे मैदान, चक्रपाणी वसाहत, पांडवनगर येथील दुर्गा माता चौक, लांडेवाडी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालय आणि भोसरीतील दिघी रस्ता येथील विरंगुळा केंद्र अशा ११ ठिकाणी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत ते होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली. स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान हीच भारत मातेला खरी वंदना ठरेल, असे ते म्हणाले. यावेळी खासदार कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर शिबिराला भेट देणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com