Amol Kolhe : '' ...ऊगाच औत खांद्यावर घेऊन हिंडत नाही!''; भाजपप्रवेशाच्या चर्चांना कोल्हेंचा पूर्णविराम

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
Dr. Amol Kolhe Latest News
Dr. Amol Kolhe Latest News Sarkarnama

पुणे : लोकसभेच्या निवडणुकांना अजून खूप वेळ आहे. आम्ही शेतकर्यांची पोरं आहोत. आणि शेतकर्यांच्या जातीचं एक वैशिष्टयं आहे. आम्ही ऊगाच औत खांद्यावर घेऊन कधी हिंडत नाही. तर वारा आणि आभाळ बघून शेत कधी नांगरायचं हे ठरवतो अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Dr. Amol Kolhe Latest News
शिवसेनेची 'महाप्रबोधन', कॅाग्रेसची 'भारत जोडो'आता राष्ट्रवादीची 'शेतकरी दिंडी'

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता याच चर्चांवर कोल्हे यांनी आपली रोखठोक भाष्य केलं आहे. ( Amol kolhe Latest News)

कोल्हे म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेला सर्वत्र मिळणारा ऊत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भाजपनं 2024च्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं असून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा निश्चय केला आहे. आणि केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंगजी पटेल यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व असेल आणि 2024 च्या लोकसभेला शिरूरमध्ये भाजपचाच ऊमेदवार असेल असं स्पष्ट केलं होतं. त्यांची अशी महत्वकांक्षा असणं यात काहीच गैर नाही. आणि जर केंद्रीय मंत्री जर असं म्हणत असतील तर ते एकप्रकारे माझ्या मतदारसंघात सुरु असलेल्या कामाचं प्रशस्तीपत्रक असल्याचं मानतो.

Dr. Amol Kolhe Latest News
Devendra Fadnavis : शरद पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर ठाकरेंनाही द्यावीच लागते ; फडणवीसांनी डिवचलं

यावेळी कोल्हे यांनी निवडून आल्यानंतर आत्तापर्यंत शिरुर लोकसभा मतदारसंघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगितलं. यात वाघोली ते शिरुर या अठरा लेन फ्लाय ओव्हरच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्ंटीची नियुक्ती, पुणे नाशिक इलिवेटेड काॅरिडाॅर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्ंटीची नियुक्ती तसेच तळेगाव,शिक्रापूर,चाकण या इलिवेटेड मार्गाची निविदा प्रक्रिया सुरु झालेली असून यांसारखे राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प सुरु आहे. याचवेळी इंद्रायणी मेडिसिटी, राष्ट्रीय वनस्पती संशोधन केंद्र यांसारख्या प्रकल्पांना मतदारसंघात आणून ते कार्यािन्वत करणं मला जास्त महत्वाचं वाटतं.

ज्या मतदार मायबापांनी मला दिल्लीत पाठवले त्यांच्या विश्वासाला पात्र ठरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत असेही कोल्हे म्हणाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in