'माझ्या शंभू भक्तीची परीक्षा मी आढळरावांसमोर द्यावी इतके वाईट दिवस माझ्यावर आले नाही'

Shivsena|Shivajirao Adhalrao Patil|Dr. Amol Kolhe|NCP: शिवसेना नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe
Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol KolheSarkarnama

पुणे : शिवसेना (Shivsena) नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) आणि राष्ट्रवादीचे (NCP) खासदार डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आज (ता.1 एप्रिल) स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) बलिदान दिनी वढू-तुळापूर येथील त्यांच्या समाधीस्थळी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी आढळराव-पाटीलांनी खासदार डॉ कोल्हेंवर निशाणा साधत विद्यमान खासदारांना निवडणुकीपुरतेच महाराज आठवतात, असा खोचक टोला लगावला. त्यावर आढळरावांनी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये. त्यांची ही संकुचित मनोवृत्ती आहे, असे लगेच प्रत्यु्त्तर कोल्हेंनी दिले.

Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe
शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या; अन्यथा, सरकारची पळता भुई थोडी होईल...

कोल्हे म्हणाले की, आढळरावांनी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये. त्यांची ही संकुचित मनोवृत्ती आहे. माझ्या शंभू भक्तीची परीक्षा मी त्यांच्यापुढे द्यावी इतकेही वाईट दिवस माझ्यावर अजून आले नाहीत, अशा शब्दात त्यांनी आढळरावांच्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. मात्र, शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळराव आणि खासदार कोल्हे यांच्यात सारखीच शाब्दीक चकमक सुरू असते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आढळरावांना कोल्हेकडून पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर या दोघांमध्ये विस्तवही आडवा जात नाही. कधी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या श्रेयवादावरून तर कधी अन्य मुद्द्यावरून दोघांमध्ये सारखेच खटके उडतांना पाहायला मिळत असतात. आता कोल्हेंच्या या पलटवारावर आढळराव काय उत्तर देतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe
भाजप नेत्यांवरही कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही; पण... : वळसे पाटलांची भूमिका

दरम्यान, काही दिवसांपुर्वी बैलगाडा शर्यतीच्या बंदी उठवण्याच्या मुद्दायवरून कोल्हे आणि आढळराव यांच्यात अशीच शाब्दिक चकमक झाली होते. बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने काही अटी टाकत परवानगी दिल्यावर बैलगाडा मालकांनी मोठ्या थाटात व पारंपारिक वाद्यात वाजतगाजत व भंडाऱ्याची उधळणीत आढळरा पाटलांची घोडीवर बसुन मिरवणुक काढली होती. त्यावेळी त्यांनी कोल्हे्च्या प्रचार काळातील घोडीवर बसण्याचा मुद्दा उकरून काढत कोल्हेंवर टीका केली होती. त्यावेळी आढळरावांनी कोल्हेंनी लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान घोडीवर आपणच बसणार असल्याचे उकरून काढत म्हटले होते की, आपणच तुमच्या आधी घोडीवर आपणच बसल्याचे सांगत कोल्हेंना डिवचले होते. त्यानंतर आढळरावांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करत कोल्हेंना घोडीवर बसायची इच्छा पूर्ण करायची असेल तर त्यांनी लांडेवाडीला यावे, असे खुले आव्हान दिले होते. तेव्हा कोल्हेंनी काही दिवसांनी आव्हान स्विकारत एका शर्यतीदरम्यान घोडस्वारी केली होती. त्यावेळी कोल्हेच्या या घोडस्वारीची चर्चा राज्यभर झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com