आढळरावांच्या पुनर्वसनासाठी कोल्हेंकडून शुभेच्छा! राऊतांना दिलं सडेतोड प्रत्युत्तर

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पुन्हा संसदेत जाणार असल्याचे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
Dr Amol Kolhe, Sanjay Raut, Shivajirao Adhalarao Patil
Dr Amol Kolhe, Sanjay Raut, Shivajirao Adhalarao PatilSarkarnama

शिरूर : शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पुन्हा संसदेत जाणार असल्याचे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्यावरून आता शिरूर मतदारसंघात शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिरूरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राऊतांच्या या विधानाला सडेतोड प्रत्युत्तर दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. (NCP MP Dr. Amol Kolhe Latest Marathi News Update)

संजय राऊत (Sanjay Raut) हे नुकतेच पुणे शहर किंवा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी मंचर येथे बोलताना त्यांनी कोल्हे (Amol Kolhe) यांच्या पोटात गोळा आणला. शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्यावतीने भरविण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धांना राऊत यांनी हजेर लावली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुढील निवडणुकांत महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचा दावाही केला. पण शिरूर लोकसभा मतदारसंघातही ही आघाडी असेल आणि आढळराव हेच खासदार असतील, असं वक्तव्यही त्यांनी केलं.

Dr Amol Kolhe, Sanjay Raut, Shivajirao Adhalarao Patil
संजय राऊत यांनी आणला अमोल कोल्हेंच्या पोटात गोळा... पुढचे खासदार आढळरावच!

राऊतांच्या या विधानावर खासदार कोल्हे यांनी प्रतिक्रिया देताना राऊतांसह आढळवारांनाही टोला लगावला आहे. कोल्हे म्हणाले, ते मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं उचित ठरणार नाही. इतक्या मोठ्या नेत्यांना संघटनेमध्ये उत्साह वाढवण्यासाठी अशाप्रकारची विधाने करावी लागतात. त्यापैकी ते विधान असू शकतं. दुसरी गोष्ट मला महत्वाची अशी वाटते की, 2024 ला काय घडणार याचं भाकित 2022 करण्याइतका मी दृष्ठा नाही.

राऊतांच्या विधानाकडे बारकाईने बघितलं तर, आढळराव हे संसदेत असतील असं त्यांनी सांगितलं. संसदेत जाण्याचे अनेक मार्ग आहेत. आढळरावांसारख्या ज्येष्ठ नेत्याचं पुनर्वसन करण्याचा विचार जर शिवसेना पक्ष करत असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत, असं कोल्हे यांनी म्हटलं आहे. यातून महाविकास आघाडीत वितुष्ट आहे, असा कोणताही अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असंही कोल्हे म्हणाले.

Dr Amol Kolhe, Sanjay Raut, Shivajirao Adhalarao Patil
Video: राजकीय मैदान गाजवणारे शिवसेना नेते संजय राऊत क्रिकेटच्या मैदानात

संघटनेमध्ये ऊर्जा देण्यासाठी अशी विधाने केली जात असतात. कोणत्याही मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कोण करणार, हे कोणताही नेता नाही तर मायबाप जनता ठरवते. त्यामुळे 2024 ला काय होणार हे आत्ताच 2022 मध्ये विचार करत बसण्यापेक्षा ज्या विश्वासाने जनतेने मला निवडून दिले आहे, त्यांचे विविध प्रश्न सोडविण्याला माझे प्राधान्य आहे. त्यामुळे यातून कोणताही दुसरा अर्थ काढू नये, असं कोल्हे यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com