
Chinchwad by-election News : चिंचवडकरांनो, २६ तारखेला एवढ्या जोराने कमळाचे बटण दाबा की, शरद पवार आणि अजित पवार यांना चारशे चाळीस व्होल्टचा धक्का बसला पाहिजे, असे आवाहन भाजपचे (BJP) प्रदेशाध्यश्र चंद्रशेखर बावनुकळे यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील पक्षाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचार सभेत शुक्रवारी केले होते. त्याचा समाचार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) युवा आमदार रोहित पवार यांनी घेताना.
पक्षाचे चिंचवडमधील उमेदवार नाना काटे यांना मिळणाऱ्या मोठ्या लीडमधून हा हाय होल्टेज धक्का भाजपला बसणार असल्याचा प्रतिहल्ला रोहित पवार यांनी आज चढवला. राष्ट्रवादीच्या दृष्टीने हा धक्का सुखद असणार आहे, असे म्हणत बावनकुळेंना असे बोलावे लागते, असा टोलाही रोहित यांनी लगावला.
काटेंच्या प्रचारार्थ काढलेल्या पदयात्रेत ते बोलत होते. आजारी खासदार गिरीश बापट यांना पुण्यात प्रचारात उतरवून भाजपने खालची पातळी गाठत माणूसकी विकून टाकल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. चिंचवडची लढत ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी दुरंगीच होणार आहे. मात्र, ही लढाई काटे विरुद्ध जगताप अशी नसून ते दोन पक्षांतील आहे, असेही ते म्हणाले.
पुण्यातील काँग्रेसचे (Congress) उमेदवार रविंद्र धंगेकर हे प्रचारासाठी स्वर्गातून गांधी यांनाही खाली आणतील, या भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना ते किती बोलतात त्याला किती महत्व द्यायचे हे समजून घ्या, अशा शब्दांत त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
पुण्यात धंगेकरांचा प्रचार करून रोहित पवार हे थेट चिंचवडला त्यासाठी आले होते. साधेपणासाठी ते ओळखले जातात. त्याचा प्रत्यय चिंचवडमध्ये आला. सकाळपासून काहीच न खाल्याने प्रचारफेरीदरम्यान भूक लागल्याने त्यांनी सर्वांना थांबवून रस्स्त्यावरच वडापाव खाल्ला. तो खाता खाता त्यांनी उपस्थित महिला आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींशीही संवाद साधला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.