By-elections News : ''कसबा अन् चिंचवडच्या पोटनिवडणुकीचा निकाल अमित शाहांनी हेरला;'' म्हणूनच त्यांनी प्रचार...

Amit Shah News : पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.
Amit Shah News
Amit Shah NewsSarkarnama

Rohit Pawar News : पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षाचे अनेक नेते निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांनी पुणे दौरा केला. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

पुणे दौऱ्यावर येऊनही शाह यांनी कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाचा (BJP) प्रचार करणे टाळले. यावरून रोहित पवार यांनी टोला लगावला आहे. अमित शाह यांनी कसबा व चिंचवडचा निकाल काय लागणार? हे अचूक हेरले आहे, त्यामुळेच त्यांनी येथे प्रचार केला नाही, असे रोहित पवार म्हणाले.

Amit Shah News
MNS : ..पक्षाचं नाव गेलं..; राज ठाकरे नावाविषयी म्हणाले, "बाळासाहेबांनी मला बोलवलं..

या संदर्भात रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये रोहित पवार म्हणाले, ''अत्यंत अचूक अंदाज बांधणारे, सूक्ष्म रणनितिकार, निवडणूक नियोजनातले निष्णात व्यक्तिमत्त्व म्हणजे अमित शाह साहेब. पुण्यात येऊनही त्यांनी कसबा आणि चिंचवडला प्रचार करणं टाळलं, हे खूप काही सांगून जाणारं आहे. कदाचित प्रदेश भाजपविरोधातील असंतोष आणि संभाव्य 'निकाल' त्यांनीही हेरला असावा!''

Amit Shah News
NCP News : राष्ट्रवादीचा बडा नेता घेणार अमित शहांची भेट

रोहित पवारांच्या ट्वीटनंतर अमित शाहांनी कसबा व चिंचवड मतदारसंघात प्रचार का टाळला? याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com