दीड हजार गणेश मंडळ कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीचे आमदार बनसोडेंनी केला असा सन्मान

NCP : आमदार बनसोडेंच्या उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
MLA Anna Bansode Latest News
MLA Anna Bansode Latest News Sarkarnama

पिंपरी : गणेशोत्सवाची सांगता नुकतीच मोठ्या उत्साहात झाली. दहा दिवसात दमलेल्या गणेश मंडळ कार्यकर्त्यांची पिंपरीचे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी काल (ता.११ सप्टेंबर) खास दखल घेतली. त्यांनी आपल्या मतदारसंघातील अशा दीड हजार कार्यकर्त्यांचा श्रमपरिहार स्नेहभोजनाव्दारे दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाची शहरातील सर्व गणेश मंडळांत व कार्यकर्त्यांत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. (MLA Anna Bansode Latest News)

MLA Anna Bansode Latest News
मुख्यमंत्री शिंदेंनी 'पेढे तुला' नाकारली अन् सभेतील गर्दी तुटून पडली...

गेली १५ वर्षे आमदार बनसोडे हे गणेश मंडळांना मदत करीत आहेत. यावर्षीही त्यांनी गणेशोत्सवात पिंपरीतील जवळपास दीडशे मंडळांना वर्गणी, तर काहींना साउंड सिस्टीमसारखे साहित्यरुपी सहाय्य केले. एवढेच नाही, तर त्यांनी गणेश विसर्जनानंतर दहा दिवस दमलेल्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना स्नेहभोजन देण्याचा पायंडा यावर्षी सुरु केला. त्यासाठी एक मंगल कार्यालयच त्यांनी बुक केले. तेथे मतदारसंघातील दीड हजार गणपती मंडळ कार्यकर्त्यांचा त्यांनी श्रमपरिहार केला. गणेशोत्सव काळात गणेशभक्तांच्या सेवेत गुंतलेल्या व विविध देखाव्यांतून त्यांचे मनोरंजन केलेल्या या कार्यकर्त्यांचेही मनोरंजन करण्याची काळजी त्यांनी यावेळी घेतली.

या उपक्रमामागील संकल्पना विशद करताना ते म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे फक्त त्या दहा दिवसापूरते नसते. मंडळात निष्ठेने, निस्वार्थीपणे काम करणारे कार्यकर्ते हे वेळ पडल्यावर समाजातील विविध घटकांच्या मदतीलाही सर्वप्रथम धावून जातात. तरीही त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा सरसकट सकारत्मक नसतो. म्हणून त्यांच्या श्रमाला कष्टाला मानसन्मान मिळावा, त्यांच्या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून हा उपक्रम सुरु केला,असे ते म्हणाले.

MLA Anna Bansode Latest News
माधुरी मिसाळ यांच्या घोषणेनं आढाळरावांच वाढलं टेन्शन

यामुळे गणेशोत्सव साजरा करायला प्रोत्साहन मिळणार आहे, अशी भावना अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. समाधान मित्र मंडळ, जाणता राजा मित्र मंडळ, साई विश्व मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ व इतर मंडळाच्या वतीने आमदार बनसोडेंचा कृतज्ञता म्हणून यावेळी सन्मान करण्यात आला. युवा नेते सिध्दार्थ बनसोडे, लहू तोरणे, मल्लेश कद्रापूरकर, सुभाष बोरकर, शशीकांत घुले, निलेश पांढरकर, प्रसाद शेट्टी, औदुंबर कळसाईत, अभिजित वाघेरे, सतीश लांडगे आदींनी या उपक्रमाचे संयोजन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in